
Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा धडाक्यात सत्तेत परतलं आहे. या सरकारमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला नसला तरी महायुतीचा (Mahayuti) शपथविधी सोहळा मात्र ग्रँड पध्दतीने होणार आहे. या सरकारने हा शपथविधी सोहळा अविस्मरणीय असावा याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
तसेच या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी यांच्यासह सामाजिक, क्रीडा, सिनेसृष्टीसह अनेक सेलिब्रेटींनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा हा येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहेत.
देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. भाजपशासित (BJP) राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहेत. या निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. तसेच विविध राज्यातील राज्यपालही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.शपथविधी सोहळ्याची तयारी जोरदार सुरु आहे.या सोहळ्यासाठी 40 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री, साधुसंत या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 'एक है तो सेफ हैं" आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान केलेले 10 हजार कार्यकर्तेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये फडणवीसाचे फॅन असलेले गोपाल बावनकुळे हे सुद्धा आहेत. गोपाल बावनकुळे हे रामनगर परिसरामध्ये चहाचा स्टॉल चालवतात.
नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता एकनाथ शिंदेंची शिवसेना सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हेही आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. भाजप नेत्यांसोबत ते आज या मैदानाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना अलिप्त राहिल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय दीपक केसरकर यांनी मैदान पाहणीवरून नाराजी दर्शवली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते मैदान पाहणीसाठी जाणार असल्यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील खातेवाटपावरून धुसफूस समोर येत आहे. शिंदेंची तब्येत पुन्हा बिघडली असून त्यांच्या भेटीसाठी भाजप नेते गिरीश महाजन गेले होते. या भेटीनंतर त्यांनी महायुतीत कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार
प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम
विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ
प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा
भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात
नायब सिंग सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा
मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
कॉनराड संगमा - …
नरेंद्र महाराज - नाणिज
नामदेव शास्त्री - भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज- इस्कॉन
गौरांगदास महाराज- इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा व मोहन महाराज
जैन मुनी लोकेश
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.