Mahayuti Politics : खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरुन अजितदादा आणि शिंदे गटात रस्सीखेच?

NCP Vs Shivsena, Raigad Guardian Minister Post : रायगडचं पालकमंत्रिपद आपल्याला मिळेल असा विश्वास शिवसेना नेते भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. मात्र ,या पदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे आग्रही आहेत.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Raigad News, 22 Dec : महायुती सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप शनिवारी (ता.21) रात्री जाहीर झालं. भाजप, शिवसेना (Shivsena) (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या युतीतील तिन्ही पक्षांच्या वाट्याला थोडेफार बदल वगळता मागील सरकारमधील खाती आली आहेत.

महायुतीतील (Mahayuti) मंत्र्यांचं खातेवाटप झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण खातेवाटप जाहीर होताच युतीतील नेत्यांनी आता पालकमंत्रिपदावर दावा करायला सुरूवात केली आहे. नुकतंच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार असं वक्तव्य केलं आहे.

तर दुसरीकडे आता रायगडचं पालकमंत्रिपद आपल्याला मिळेल असा विश्वास शिवसेना नेते भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची कन्या आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आग्रही आहेत. त्यामुळे आता या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

भरत गोगावले काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, मला मंत्रिपद मिळाल्याने मी समाधानी आहे. मुंबईत आल्यानंतर आम्ही सगळेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन आम्ही दर्शन घेतलं. माझ्यासह आमचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत, असं म्हणतच त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर आमचा दावा असणार आहे, त्याची काही काळजी करु नका, असं सूचक वक्तव्य केलं.

Ajit Pawar, Eknath Shinde
Chhatrapati Sambhajinagar : खातेवाटप जाहीर होताच मंत्रि‍पदी वर्णी लागलेला शिंदेंचा 'हा' नेता म्हणतो पालकमंत्रीही मीच होणार...

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा इतिहास

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होतं. यावेळी शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी तटकरेंविरोधी भूमिका घेतली होती. या काळात गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उदय सामंतांकडे रायगडचं पालकमंत्रिपद गेलं.

Ajit Pawar, Eknath Shinde
Chandrashekhar Bawankule : तिकीट कापलं तरी संयम ठेवला! खातेवाटपात चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालं मोठं बक्षीस

मात्र, त्यावेळी अजित पवार सत्तेत नव्हते. 2023 मध्ये अजितदादा महायुतीचा भाग बनल्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. तर दुसरीकडे आदिती तटकरे देखील या पदासाठी आग्रही आहेत. अशातच आता गोगवले यांनी पालकमंत्रिपदावर दावा केल्यामुळे युतीत खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेंच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com