Manoj Jarange: अमित शहा एका अटीवर लालबागच्या दर्शनाला आले! मराठा आंदोलकांना...; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

Manoj Jarange: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.
Manoj Jarange_Amit Shah
Manoj Jarange_Amit Shah
Published on
Updated on

Manoj Jarange: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. आजच्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाला भेट दिली आणि सहकुटुंब दर्शन घेतलं. पण लालबागच्या राजाच्या दर्शनाला येण्यासाठी त्यांनी एक अट टाकली होती, ही अट मराठा आंदोलकांबाबत होती, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

Manoj Jarange_Amit Shah
USA Tariff : ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ टॅरिफ लावण्यामागचं खरं कारण आलं समोर! 17 तारखेचा तो फोन कॉल अन्...

आझाद मैदानातील उपोषणस्थळावरुन माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "मराठा आंदोलन हे वेगळ्या वळणावर गेलेलं नाही. गैरसमज नको, माझे मराठे शांत आहेत संपूर्ण मुंबईत आहेत आणि शांत आहेत. आम्ही शांतच राहणार आहोत, ते वेगळ्या वळणावर गेलेले नाहीत. उलट आमच्या एका मुलाला सीएसएमटी समोर का महानगरपालिकेसमोर अॅटॅक आला. व्यवस्थित असलेला आमचा पोरगा मेला ना! त्याला खूनच म्हणतात. काल शिवनेरीला एक अॅटॅक आला, तो पण एक प्रकारचा खूनच आहे, अशा शब्दांत जरांगेंनी सरकारवर आरोप आगपाखड केली. तसंच मराठा आंदोलकांच्या मृत्यूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारणीभूत धरलं.

Manoj Jarange_Amit Shah
Sharad Pawar : गांधी-नेहरुंच्या विचारसरणीच्या अहिल्यानगरमध्ये RSSचा विचार रुजतोय, त्यातून...; शरद पवारांनी का व्यक्त केली चिंता?

दरम्यान, यावेळी जरांगेंनी एक खळबळजनक दावाही केला. त्यांनी साम टीव्हीच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की, "मला एवढ्यात अशी माहिती मिळाली आहे हे किती खरं खोटं मला माहिती नाही. पण लालबागच्या गणपतीला अमित शहा येणार होते ते फक्त एकाच अटीवर इथं आले ते म्हणजे मराठा आंदोलकांसाठी या गणपती मंडळानं मदत करु नये. लालबागचं हे मंडळ गोरगरिबांसाठी जेवायला करत होतं, पण सरकारनं लालबागच्या मंडळाला सांगितलं की आम्ही अमित शहांना इथं दर्शनासाठी आणतो तुम्ही फक्त मराठा आंदोलकांसाठी जे जेवण सुरु केलंय ते बंद करा"

Manoj Jarange_Amit Shah
Vasant Gite: ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीतेंची रोखठोक भूमिका! मराठा आरक्षणावरुन राजकारण करणाऱ्यांना झापलं

मनोज जरांगे यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. पण जरांगेंच्या दाव्यात किती तथ्य आहे किंवा त्यांना ज्यानं कोणी ही माहिती दिली त्यात किती तथ्य आहे हे तपासलं पाहिजे असंही लोक कमेंट करुन विचारु लागले आहेत. यावर काहीजण म्हणताहेत की आझाद मैदान ते लालबागचा राजाचं अंतर हे सात ते आठ किमीचं आहे. त्यामुळं असं काही असण्याची शक्यता वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com