Mumbai News : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहेत. मात्र, लाठीहल्ल्यापासून आतापर्यंतच्या या सर्व घडामोडीत फडणवीसांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे पुढे आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांंनी एकदाच फोन केला आणि ‘तब्येत कशी आहे’, एवढंच विचारलं, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation : Devendra Fadnavis Phone Called Jarange once and spoke only one sentence...)
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आणि इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाला होता. त्या लाठीहल्ल्यावरून राज्यात प्रचंड राजकीय गदारोळ, आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी खुद्द मनोज जरांगे पाटील आणि जखमी झालेले कार्यकर्तेही पोलिसांना वरून आदेश आल्यानंतर लाठीहल्ला झाला, असे सांगत होते. त्यामुळे सगळ्यांचा रोख गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होता. त्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लाठीहल्ल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. ती परिस्थिती पाहून लाठीहल्ला झाल्याबद्दल गृहमंत्री फडणवीस यांनी माफी मागितली होती. त्यानंतर वातावरण निवळले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीमधून लाठीहल्ल्याचा आदेश फडणवीस यांनी दिला नव्हता, असे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, याच मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना फडणवीस यांनी लाठीहल्ला झाल्यानंतर माफी मागितली. त्यानंतर त्यांच्यावर बोलणे मी थांबवले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषण सोडायला आले म्हणजे सर्व सरकार आल्यासारखंच असतं. त्यामुळे फडणवीस भेटायला आले नाहीत, असे म्हणता येणार नाही. जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा ते भेटायला येतील. त्यांनी माफी मागितल्यापासून त्यांच्याविषयी आमच्या मनात काहीही नाही, हे मी प्रामाणिकपणे सांगतो, असे स्पष्ट केले.
अंतरवाली सराटीत उपोषणाला बसल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांचा मला एकदा फोन आला होता. त्यांनी ‘तब्येत कशी आहे,’ अशी माझी चौकशी केली. मीही ‘चांगली आहे,’ एवढंचं बोललो. तीसेक सेकंद बोललो असेन. कारण बोलायला त्यांच्याकडे आणि माझ्याकडंही काही नव्हतं. माझ्याकडे आलेल्या मंत्र्यांसोबत अगोदरच सगळं ठरलं होतं. त्या मंत्र्यांसोबत झालेले बोलणं, फडणवीस यांना कदाचित माहिती झालं असेल, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.