Maratha Reservation : मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडूनच भुजबळांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम; शेंडगेंचा रोख कुणाकडे?

Maratha Reservation In Maharashtra Obc Leader Prakash Shendge Allegations : आरक्षणावरून मराठा आणि ओबीसीमधील वाद वाढत चालला आहे. हा वाद राज्य सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. यावर आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी बोट ठेवले आहे....
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation vs Obc Reservation : मराठा आरक्षणावरून राज्यात ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. तसंच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यावरून शिंदे गटाचे मत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर यांनी भुजबळांवर टीका केली होती. आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळात एकमेव ओबीसी मंत्री असलेल्या छगन भुजबळांना मंत्र्यांकडूनच टार्गेट केलं जात असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal
Maharashtra Politics: शिंदे, फडणवीसांची मंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा; सरकारमधील समन्वयासाठी सूचना

सरकारने सरसकट कुणबी नोंदी करून जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला तर मग वाद निर्माण होईल. आणि ओबीसींना रस्त्यावरची लढाई लढण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असं शेंडगे पुढे म्हणाले. मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ हे एकमेव ओबीसी मंत्री आहेत. आणि तो आमच्यासाठी लढतोय. आणि अशा प्रकारे त्याला टार्गेट करण्याचा कार्यक्रम सरकारमधलेच काही मंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी, सरकारने आणि सर्वपक्षीय नेत्यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका छगन भुजबळांनी मांडली आहे. आणि त्यात भुजबळांना टार्गेट करण्यासारखं काय आहे? असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ १९९१ पासून भूमिका मांडत आहेत. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी काही नेत्यांनी त्यावेळी विरोध केला होता. ओबीसींसाठी त्यावेळी भुजबळांनी पक्षत्यागही केला होता. आणि आतापर्यंत ते लढत आहेत. म्हणून आम्ही भुजबळांच्या पाठिमागे ठामपणे उभे आहोत. ते सरकारमध्ये असो किंवा नसोत. ते आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असं शेंडगे यांनी सांगितलं.

'ओबीसी ६० टक्के, कोणी त्यांना कमी लेखू नये'

आम्ही एवढे धनदांडगे नाही. आणि रस्त्यावरती उतरून लाठ्याकाठ्यांची लढाई आम्हाला करायची नाही. पण मतपेटीची लढाई मात्र आहे. आणि ती लढाई लढल्याशिवाय ओबीसी राहणार नाही. आशाच प्रकारे आमचं आरक्षण लुटलं गेलं तर २०२४ च्या निवडणुकीत कुठलंही सरकार असू दे, त्याला धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. राज्यात ओबीसींची संख्या ही ६० टक्के आहे. यामुळे या व्होट बँकेला कोणी कमी लेखू नये. आम्हीही मोठ्या संख्येने मेळावे घेऊ आणि दाखवून देऊ हम भी किसीसे कम नहीं, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal
Prakash Shendge News : मराठा आरक्षणाचा पोपट मेला, त्यांनी EWS चा लाभ घ्यावा; ओबीसी नेते शेंडगेंचे विधान..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com