Maratha OBC Reservation : ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा दुहेरी डाव, भुजबळांचा गंभीर आरोप

Maratha Reservation Issue In Maharashtra Chhagan Bhujbal Allegations : मराठा आणि ओबीसी ही लढाई आता रस्त्यावरून न्यायालयात गेली आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी हा संघर्ष दुहेरी स्तरावर सुरू झाला आहे.
Chhagan Bhujbal, Manoj Jarange-Patil News
Chhagan Bhujbal, Manoj Jarange-Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा समाजाचे बाळासाहेब सराटे यांनी २०१८ मध्ये न्यायालयात एक प्रकरण दाखल केलं होतं. ओबीसीमध्ये सध्या ज्या जाती आहेत, म्हणजे भटके विमुक्त, माळी, तेली, कुणबी यांचा ओबीसीमध्ये झालेला समावेश हा बेकायदेशीर आहे.

आणि त्याचं पुनर्सर्वेक्षण करण्यात यावं आणि तोपर्यंत सर्व जमातींचं ओबीसी आरक्षण रोखण्यात यावं, अशी मागणी सराटे यांनी याचिकेतून केली आहे. आता त्यांनी पुन्हा ती केस उकरून काढली आणि ती लढायची असल्याचं म्हटलं आहे, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

पण न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी ३५ व्या क्रमांकावर आहे, असं ते म्हणाले. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाविरोधात सराटे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेसंदर्भात छगन भुजबळ हे मुंबई उच्च न्यायालयात आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange-Patil News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 'ॲक्टिव्ह मोड'वर; म्हणाले, माझी प्रकृती आता व्यवस्थित...

कायदेशीर मार्गाने मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. यामुळे अशा काही लोकांना एका बाजूने मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना घ्यायचं आणि ओबीसीमध्ये यायचं. आणि दुसऱ्या बाजूने जे ओबीसी आहेत, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात लढून त्यांना ओबीसीतून बाहेर ढकलायचं, असा हा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. कायदेशीर आणि राजकीय लढाई आमची सुरू आहे, असं भुजबळांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाऊन सर्व प्रकारचं आरक्षण पाहिजे आहे आणि तेही ते म्हणतील तसं आरक्षण हवं आहे. एकाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं, की त्याच्या पत्नीच्या १५० लोकांना आणि त्याच्या कुटुंबाच्या २०० लोकांना मिळेल.

असं करून सगळेच आपोआप कुणबी झाले. आणि कुणबी झाले की मग ते ओबीसीत आले, मग त्यांना शिक्षणाचे नोकरी आणि राजकारणाचे सर्व हक्क मिळतील. एवढ्या ३७५ जाती आहेत. यात मराठा समाज आला, तर कुणालाच काही मिळणार नाही. आणि ओबीसी संपतील, असं ते पुढे म्हणाले.

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये. तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या. कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील, त्या दुरुस्त करा आणि सर्वोच्च न्यायालयात लढा. मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही मतदानही केलं आहे. म्हणून त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, पण आता ओबीसीतून सरसकट आरक्षणाची मागणी केली आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange-Patil News
Maratha Reservation : साताऱ्यात मराठा समाज आक्रमक; भुजबळांच्या राजीनाम्‍याची केली मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com