Maratha Reservation: शिंदे समितीने ओबीसींच्याही नोंदी शोधाव्यात, श्वेतपत्रिका काढावी; वडेट्टीवारांचा भुजबळांना पाठिंबा

Maratha Reservation Obc Reservation Vijay Wadettiwar Reaction : विरोधी पक्षनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे...
Vijay Wadettiwar, Chhagan bhujbal
Vijay Wadettiwar, Chhagan bhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Issue In Maharashtra : विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. ते ओबीसी आहेत. का होतात? तर ओबीसी असल्याने सर्व काही मिळतं, असं वातावरण निर्माण केलं गेलं. जे आरक्षण आहे ते समाजाला अपूरं आहे. यामुळे तुम्ही येणार तर वाढवून घ्या, वेगळा प्रवर्ग घ्या. ओबीसी समाजाला दुखवू नका आणि मराठा समाजालाही दुखवू नका. दोघांनाही कुठेतरी समाधान मिळालं पाहिजे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अशी सरकारची भूमिका आहे, तशीच आमची भूमिका आहे, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

सरकार म्हणून जी भूमिका मांडायला हवी, ती सरकार मांडताना दिसत नाही. हे एकूणच राज्यातलं वातावरण दूषित करणारं आणि गढूळ करणारं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर केला आहे.

Vijay Wadettiwar, Chhagan bhujbal
OBC Reservation : हे षडयंत्र हाणून पाडू..., मराठ्यांनंतर आता ओबीसी रस्त्यावर उतरणार; जालन्यातील अंबडमध्ये पहिला मेळावा

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आपला आधीही विरोध होता आणि आताही आहे. शिंदे समितीने कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू केलं आहे. त्या बरोबरच ओबीसींच्या सर्व जातीच्या नोंदी शोधाव्यात. आणि त्यासंदर्भात राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी. जात प्रमाणपत्रासाठी ओबीसींकडे पुरावे मागितले जातात. आणि पुरावे न मिळाल्याने त्यांना नोकरीपासून वंचित राहावं लागतं. जे काही लाभ मिळतात, त्यापासूनही वंचित राहावं लागतं. तुम्ही जर १ कोटी ८२ लाख नोंदी शोधत आहात तर संपूर्ण नोंदी शोधा. त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा. त्यात कुठल्या ओबीसी आणि कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, ते स्पष्ट करावं, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसींच्या नोंदी काढण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. यामुळे आमचाही त्रास कमी होईल. यामुळे जात प्रमाणपत्र काढताना फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आणि राहिला प्रश्न मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याचा तर आमचा त्याला शंभर टक्के विरोध आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. ओबीसींच्या मेळावे आणि कार्यक्रम होणार त्याला माझा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाज आणि ओबीसींमधील वाद वाढणार, यासाठी तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar, Chhagan bhujbal
Maratha Reservation : "भुजबळांचं भडक वक्तव्य", शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांना भेटणार; मंत्रिमंडळ बैठकीत वादाची चिन्हे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com