प्रकाश लिमये
Pratap Sarnaik News : भाईंदर पश्चिम येथील एका मराठी कुटुंबाला भाड्याने घर देण्यास नकार देण्यात आला आहे. मराठी माणसाला घर भाड्याने देत नाही, असे उत्तर या कुटुंबाला देण्यात आले. या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलेची भेट घेतली. घर नाकारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.
रेणुका शिंदे या महिलेने भाईंदर पश्चिम भागात चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. स्वत:ची जागा नसल्याने सध्या त्या पती आणि आपल्या लहान बाळासह दुकानामध्येच वास्तव्य करत आहेत. जागेची अडचण भासू लागल्याने त्यांनी परिसरात भाड्याने घर शोधायला सुरुवात केली. त्यासाठी इस्टेट एजंटशी देखील संपर्क साधला.
जवळच असलेल्या इमारतीमधील घर त्यांना पसंत पडले. मात्र त्या मराठी असल्यामुळे घर मालकाने घर देण्यास नकार दिल्याचे इस्टेट एजंटने त्यांना सांगितले. यावर आपण शाकाहारी असून केवळ राहण्यासाठी घर हवे असल्याचे त्यांनी संबंधितांना सांगितले. तरीदेखील मराठी व्यक्तींना आपण घर देत नसल्याचे घरमालकाने सांगितले.
होत असलेला अन्याय महिलेने समाजमाध्यमांवर चित्रफितीद्वारे मांडला. त्याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (ता.२९) महिलेची भेट घेतली व तिच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे महिलेला सांगितले. यावेळी त्यांनी संबंधित घर मालकाला बोलावून त्याला चांगलेच खडसावले
मराठीच्या मुद्द्यावर घर नाकारणे कधीही सहन केले जाणार नाही. मराठी माणसाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसा प्रयत्न झाला तर त्याला शिवसेना स्टाईल ने प्रत्युत्तर दिले जाईल शिवाय कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे मिरा-भाईंदर शहरात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.