Crime News Video : कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतियाची दादागिरी; अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मराठी कुटुंबाला बेदम मारहाण

marathi family was beaten kalyan Police Crime : एका अल्पवयीन मुलीशी उत्तम पांडे याने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे.
Crime News
Crime Newssarkarnama
Published on
Updated on

Crime News : कल्याण मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरीची घटना समोर आली आहे. परप्रांतीय व्यक्तीने एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. उत्तम पांडे (वय 40) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला पांडे व त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील आडीवली ढोकळी परिसरात एका अल्पवयीन मुलीशी उत्तम पांडे याने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना पांडे याने तिला घरात ओढून तिच्यासोबत गैरवर्तन केले. मुलीने सदर घटना आपल्या वडिलांना सांगितली.

Crime News
NCP politics : 'छगन भुजबळांनी पंतप्रधान व्हावे', अजितदादांचा मंत्री काय म्हणाला?

वडिलांनी पांडे याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी पांडे याने तिच्या वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात करत मारहाण केली. पीडित मुलीच्या आजीने मुलीच्या आईला हे सांगताच ती देखील घरी आली. तिला सगळा प्रकार समजताच तिने जाब विचारताच पांडे याची पत्नी रिना हिने मुलीची आई व आजीला मारहाण केली.

याघटनेत पीडित मुलीचे वडील, आई व आजी जखमी झाले आहेत. मुलीचे वडील हे मुंबई पोलिस दलात कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात उत्तम पांडे व त्याची पत्नी रिना पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघाना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.

Crime News
Mahayuti Guardian Minister Allotment : खाते वाटपात कमी-जास्त झालं, आता पालकमंत्री पदांचे वाटप कसं होणार? मंत्री बावनकुळेंनी थेट सांगून टाकलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com