

Pune News: राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मोठा गाजावाजा करत उद्घाटन केलेल्या पुणे-मुंबई महामार्गावरील 'मिसिंग लिंक'वरही अगोदर खड्डे आणि सोमवारी (ता.6 जुलै) दरड कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुनच आता माजी मंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजप तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राज्यभरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र हाहा:कार उडवला आहे. यामुळे रस्ता खचल्याचं, झाडपडी, अपघात अनेक दुर्घटना घडतानाच मोठी वाहतुककोंडीला सामोरे जावं लागत आहे. यातच मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे आता हा मार्गावर प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे. काही प्रवाशांना वाहतुककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचदरम्यान, आता आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणतात, 'मिसिंग लिंक'चे उद्घाटन १ मे २०२६ रोजी करण्यात आले. सर्व “इन्फ्रा वॉचर्स” आणि भाजप म्हणजे विकास ह्या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक वास्तव... ह्या प्रकल्पाची किंमत हजारो कोटी रुपयांनी वाढवण्यात आली. हा पैसा गेला कुठे? असा संतप्त सवालही ठाकरेंनी यावेळी ट्विटमधून उपस्थित केला आहे.
तसेच त्यांनी पैसा जनतेचा... काँट्रॅक्टर्सची मजा आणि त्रास जनतेलाच! आता उद्घाटन आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच येथे दरड कोसळली आहे आणि इतरही गंभीर समस्या समोर आल्या असल्याचाही मुद्दाही आदित्य ठाकरे यांनी उचलून धरला आहे.
आमदार आदित्य ठाकरे पोस्टमध्ये म्हणतात, मागच्या आठवड्यात इथे खड्डे पडल्याची बातमी देखील आली होती. जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना ह्या मार्गाचा वापर करताना माझ्या लक्षात आले आणि मी ते सार्वजनिकरित्याही मांडले होते, ह्या रस्त्याचा ५० फूटापर्यंतही एक सरळ आणि सपाट भाग नसल्याचं खळबळजनक दावाही त्यांनी ट्विटमधून केला आहे.
संपूर्ण रस्ता उंच-सखल असून त्यावरून प्रवास करताना जणू काही बोटीत बसून लाटांवरून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो. भ्रष्टाचार हेच भाजप आणि मिंधे सरकारचे पहिले नाव आहे, मग तो रस्त्यांमधला असो किंवा मंदिरातला असा सनसनाटी आरोपही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यातला संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात तातडीनं आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पूरस्थिती, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरातील दरड, मानखुर्द दुर्घटना तसेच राज्यभर झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरातील दरड, मानखुर्द दुर्घटना तसेच राज्यभर झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात यापूर्वीही मुसळधार पाऊस झाला आहे, मात्र यावेळची परिस्थिती अभूतपूर्व आणि अत्यंत चिंताजनक आहे. मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई–पुणे महामार्ग, मिसिंग लिंक प्रकल्प परिसर, आळंदीतील पूरस्थिती, रेल्वे सेवा विस्कळीत होणे आणि विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यातील दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात तातडीने आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, आता समोर येणारे दृश्य अत्यंत धक्कादायक आहेत.
मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, आता समोर येणारे दृश्य अत्यंत धक्कादायक आहेत. या प्रकल्पासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला असताना, त्याचे सुरक्षा लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) झाले होते का? नैसर्गिक आपत्तींचा विचार करून नियोजन करण्यात आले होते का? याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.