Palghar Assembly News, 30 Oct : शिंदेंच्या शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड दुखावलेले आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्याशी कुटुंबियांचा देखील संपर्क होत नव्हता.
अखेर आता तब्बल 36 तासांनंतर त्यांचा कुटुंबियांशी संपर्क झाला असून त्यांनी आपण सुखरुप असल्याचं घरच्यांना सांगितलं आहे. शिवाय ते मध्यरात्री त्यांच्या घरी येऊन कुटुंबियांना देखील भेटून गेले आहेत. त्यामुळे अखेर आता कुटुंबियांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
तर वनगा (Shrinivas Vanga) पालघरमधील आपल्या घरी आले तेव्हा त्यांनी कुटुंबियांशी काहीवेळ बातचीत केली. त्यानंतर ते पुन्हा घराबाहेर पडले. तर या भेटीत ते नेमकं काय बोलले याबाबतची माहिती त्यांच्या पत्नी सुमन वानगा यांनी दिली आहे.
साम टीव्हीशी बोलताना सुमन वानगा (Suman Vanga) म्हणाल्या, "त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून ते बाहेर होते आणि आता ते आराम करत आहेत. ते पुन्हा एकदा घराबाहेर गेले आहेत. पण त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते त्यांची काळजी घेत आहेत. दरम्यान, यावेळी 'त्यांना मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली आहे का तुमचं पुढचं पाऊल काय असणार?'
याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, 'पुढचं पाऊल काही नाही आधी त्यांची तब्यत बरी होऊद्या, कार्यकर्ते बोलत होते, मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) देखील त्यांची काळजी वाटत होती. रात्री आल्यावर त्यांच्याशी फोन करून दिला. मग फोनवरून मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ते आता बरे आहेत, काळजी करू नका.'
तर मुख्यमंत्र्यांनी फोनवर काही आश्वासन दिलं आहे का? असं विचारलं असता ते काही बोलू शकत नाही, शिवाय ते आता कुठे आहेत ते देखील माहिती नाही. पण ते आले होते आणि काळजी घेत आहेत, असं वनगा यांच्या पत्नी सुमन यांनी सांगितलं.
शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी डावलून भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावीत यांना पालघरमधून उमेदवारी दिल्यामुळे वनगा प्रचंड नाराज झाले होते. दुखावलेले वनगा घरी काहीही न सांगता सोमवारपासून बेपत्ता झाले होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. पोलिस त्यांचा तपास घेत होते. अखेर मंगळवारी मध्यरात्री ते घरी आले आणि कुटुंबियांची बातचीत करून पुन्हा घराबाहेर पडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.