Gopichand Padalkar Meet Fadnavis : आमदार पडळकरांनी घेतली फडणवीसांची भेट; 'बाळूमामा' मंदिर व्यवस्थापनाबाबत केली 'ही' मोठी मागणी

Sant Balumama Temple News : '' सदर देवस्थानची नावलौकिकता पाहता व्यवस्थापन समितीकडून होत असलेले भ्रष्टाचार न सांगण्यासारखे आहेत..''
Gopichand Padalkar, Devendra Fadnavis
Gopichand Padalkar, Devendra Fadnavis Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्यानं राज्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत असतात. भाजपचा आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. अहमदनगरच्या नामांतराचा लढा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे संत बाळूमामा देवस्थान आहे. करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिराच्या व्यवस्थापनाकरिता शासन स्तरावरून धनगर समाजातील लोकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.

Gopichand Padalkar, Devendra Fadnavis
Satara News : शंभूराज देसाईंची संजय राऊतांवर टीका...म्हणाले, तो तर चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट

निवेदनात पडळकर काय म्हणाले..?

श्री संत बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान आहे. संपूर्ण भारतातून तसेच परदेशातून भक्त मंडळी या देवस्थानाच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच भक्तिभावाने पूजाअर्चा करतात व दिलखुलास दान दक्षिणा देतात. मी देखील संत बाळूमामांचा भक्त आहे. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हा न्यास कोल्हापूर येथील धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे नोंदणीकृत आहे. या न्यासाच्या संदर्भात कोल्हापूर धर्मादाय सहआयुक्त यांनी व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट आचरणामुळे रिक्त केलेली आहे. या देवस्थानची नावलौकिकता पाहता व्यवस्थापन समितीकडून होत असलेले भ्रष्टाचार न सांगण्यासारखे आहेत असंही पडळकर निवेदनात म्हणाले आहेत.

तसेच देश, परदेशातून येणाऱ्या भक्त मंडळींची होत असलेली गैरसोय, देवस्थानच्या मालकीच्या मिळकतीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार(Corruption), जंगम व स्थावर मालमत्तेचा होत असलेला गैरवापर रोखणे अत्यंत गरजेचं आहे. त्याकरिता आपल्या स्तरावरून उपाययोजना होणे फार गरजेचे आहे असल्याचं मत आमदार पडळकर यांनी व्यक्त केलं आहे.

Gopichand Padalkar, Devendra Fadnavis
Nilesh Lanke Vs Vikhe : ...जेव्हा नगरमध्ये खासदार विखे आणि आमदार लंके समोरासमोर येतात !

धनगर समाजातील लोकांची नियुक्ती करावी...

कोल्हापूर येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरासंदर्भात शासनाकडून स्पेशल कायदा कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान या न्यासाला देखील कायदा करण्यात यावा. या मंदिराच्या व्यवस्थापनाकरिता शासन स्तरावरून धनगर समाजातील लोकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)कडे केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.