

Raj Thackeray Eknath Shinde meeting : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल (गुरुवारी) ठाण्यातील नंदनवनमध्ये भेट झाली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्या चर्चेला सुरूवात झाली होती. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट राजकीय होती का? राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भेटीमागचं कारण सांगितले.
"प्रत्येक भेटीत राजकारण नसते, काल शिंदेंना भेटलो उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना भेटेन, असे राज ठाकरे यांनी आज माध्यमांशा बोलताना स्पष्ट केले. पार्किग, रस्त्यांच्या विषयांवर मी एकनाथ शिंदे यांना भेटलो, शहरांची स्थिती काय, याची माहिती त्यांना दिली, असे ते म्हणाले. दोन्ही नेत्यांची भेट ही राजकीय नव्हती, अशी माहिती आता समोर येत आहे.
राजकारणासाठी नाही तर शहरांच्या समस्यांसाठी आमच्यात चर्चा झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे म्हणाले, 'प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधू नये. सूचना द्यायच्या असतील तर भेटी नको का? काल शिंदेंना भेटलो उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन. कुणी कुणाला भेटावे यामागे राजकारण शोधू नये,"
"पूर्वी निकोप राजकारण होते. निवडणुकांनतर नेते एकमेंकांना भेटायचे, आता तसे होत नाही. आमच्या भेटीत शिंदेंनी माझे म्हणणे ऐकून घेतले. शिंदे यांनी मुंबईचे आयुक्त भूषण गगरानी यांच्याकडे मी दिलेली फाईल पाठवली, पुढे याचे काय होते ते गगरानी यांना विचारा," असे राज ठाकरे म्हणाले.
परप्रांतियांचे लोंढे थांबत नाही, यावर विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की त्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड आपलेच लोक देतात, त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असा घणाघात ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊता यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. "एकनाथ शिंदे हे त्या अर्थाने महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या मदतीने चोरली. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमचे भांडण आहे आणि ते कायमच राहणार आहे. हे आमचे वैयक्तिक भांडण नसून महाराष्ट्राच्या हिताचे स्वाभिमानाचे भांडण आहे. हे भांडण आम्ही टोकाला नेऊ, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
'कुणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला त्यामधून राजकारण शोधायचे असे नाही. एकतर तीन वर्षानंतर निवडणुका आहेत. आता तर परिस्थिती तशी नाहीच आहे. निवडणुका संपलेल्या आहे. आज ते सत्तेवर आहेत. आम्हाला जर काही सजेशन्स द्यायचे असतील. जर चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर भेट व्हायला नको का? प्रत्येक वेळेला त्यामधून काही तरी राजकारण शोधले पाहिजे याची काही आवश्यकता नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटेल.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.