Sanjay Raut reaction to Sandeep Deshpande’s viral post
Sanjay Raut reaction to Sandeep Deshpande’s viral postSarkarnama

Sanjay Raut: 'त्या' फोटोनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंना संजय राऊत म्हणाले, 'मला 27 भाजपा आमदारांचे फोन!

Sanjay Raut reaction to Sandeep Deshpande’s viral post : महिनाभरापूर्वी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत भाष्य केले होते. या गोष्टीला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण पुढे याबाबतच्या चर्चा थांबल्या.
Published on

Mumbai News: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबतच्या चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये रंगत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील नेते यावर सावध प्रतिक्रिया देत आहेत.

आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लिहिलेले पुस्तक वाचत असलेला फोटो समाज माध्यमांवर टाकत युतीच्या चर्चांना पुन्हा हवा दिली. देशपांडेंनी शेअर केलेल्या फोटोचं कौतुक करीत राऊतांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप देशपांडे यांनी राऊतांचे 'नरकातला स्वर्ग'हे पुस्तक विकत घेतले आहे. सध्या ते पुस्तकाचे वाचन करीत आहेत. त्याचा फोटो देशपांडेंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'लपवण्यासारखे काही नाही...' अशी कॅप्शन देत देशपांडेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य न करताना गुढ संकेत दिले आहेत. तोच फोटो शेअर करीत राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sanjay Raut reaction to Sandeep Deshpande’s viral post
Thackeray Brothers Reunion : 'लपवण्यासारखे काही नाही...'; ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसे नेत्याकडून फोटो शेअर

अरे व्वा!! हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे! आता पर्यंत मला २७ भाजपा आमदारांचे फोन आले; 'नरकातला स्वर्ग' एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी! असे राऊतांनी देशपांडे यांना एक्सवरुन सांगितले आहे.

ठाकरे गट अन् मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. विधानसभा निवडणुकीतही मुंबईतील काही जागांवर मनसेने उमेदवारी दिल्यामुळे ठाकरे गटाचे काही आमदार निवडून आल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बुधवारी याबाबतचे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे युतीबाबत दोन्ही पक्षातील नेते सकारात्मक असल्याचे सध्याचे चित्र आहे.

महिनाभरापूर्वी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत भाष्य केले होते. या गोष्टीला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण पुढे याबाबतच्या चर्चा थांबल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणून लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पु्न्हा आता युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येतील, असे काही राजकीय विश्लेषकांना वाटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com