Bangladesh India Relation: बांग्लादेश कुणाच्या बाजूनं राहणार, चीन, पाकिस्तान की भारत? सत्ता काबीज करताच तारीक रहमान यांचं मोठं विधान, म्हणाले....

Bangladesh India Relations : बांग्लादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात लढवल्या गेलेल्या BNP पक्षाला तब्बल 212 जागा मिळाल्या आहे. या बीएनपीच्या लाटेत इतर पक्षांचा सुपडासाफ झाला आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच भारत आणि शेख हसीना यांच्याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election results
BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election resultsSarkarnama
Published on
Updated on

Bangladesh News: बांग्लादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत बांग्लादेश नॅशनलिस्ट पक्षाने (BNP) बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान हे बांग्लादेशचे नवे पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहेत. यानंतर तारिक रहमान यांनी भारत,चीन,पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे.

बांग्लादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात लढवल्या गेलेल्या BNP पक्षाला तब्बल 212 जागा मिळाल्या आहे. या बीएनपीच्या लाटेत इतर पक्षांचा सुपडासाफ झाला आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच भारत आणि शेख हसीना यांच्याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

तारीक रहमान यांची शपथविधी सोहळ्यापूर्वीच त्यांना आगामी काळात बांगलादेशचे भारत, पाकिस्तान आणि चीनसोबतचे संबंध कसे असणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तारीक रहमान म्हणाले, आमचं सरकार हे चीन, भारत आणि पाकिस्तानसोबत बांगलादेशच्या हिताचं संरक्षण करणाऱ्या नीतींचं पालन करणार असल्याचं सांगितलं आहे.

याचदरम्यान, बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणावरही त्यांनी भाष्य केलं. आमचं परराष्ट्र धोरण हे येथील जनतेला अनुकूल असं असेल. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची बाब ही कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असणार आहे,असंही तारिक रहमान यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election results
Rahul Narwekar Video :'स्फोटक दावा, त्याहून स्फोटक खुलासा! राऊतविरुद्ध नार्वेकर वादाला नवा ट्विस्ट; शेतकरी म्हणतो, 'मला ओढू नका..!'

तारिक रहमान म्हणाले, देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. मागील सरकारने येथील प्रत्येक संस्थेचं राजकीयकरण केलं होतं. त्यामुळे सर्वात आधी देशात सुशासन स्थापन करणं हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे. सध्या बांग्लादेशसमोर अनेक आव्हानं उभी असून आमची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. बांगलादेशमध्ये परदेशीय गुंतवणूक आणून आमच्या येथे रोजगार वाढवणार असल्याचंही तारीक रहमान यांनी यावेळी सांगितलं.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर बांग्लादेशात हंगामी सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यांचे नेतृत्व मोहम्मद युनूस यांच्या हाती होते.

BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election results
Telangana local body Election: तेलंगणात 'स्थानिक'च्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान; निकालात भाजपचा उडाला धुव्वा!; राहुल गांधींचं मोठं विधान, म्हणाले...

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बांग्लादेशमध्ये निवडणुका घेतल्या. या निवडणुकांमध्ये हसीना यांच्या अवामी लीग सहभागी झाली नव्हती. बीएनपी आणि जमान ए इस्लाम या पक्षांमध्येच मुख्य लढत झाली. मात्र, त्यात बीएनपीनं मोठ्या बहुमत मिळवत 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे.

बीएनपी पक्षाची स्थापना झियाउर रहमान यांनी 1978 मध्ये केली होती. या इस्लामिक कट्टर उजवी विचारसरणी असलेला हा पक्ष आहे. झियाउर रहमान हे बांग्लादेशचे राष्ट्रपती होते. तर, त्यांची मुलगी खालिदा झिया यांनी पंतप्रधान पद भूषवले आहे. आता त्यांचे पुत्र तारिक रहमान हे बीएनपीचे नेतृत्व करतात. निवडणुकीत ते ढाका आणि बोगरा या दोन जागांवरून विजय मिळवला आहे.

BNP leader Tarique Rahman reacts after Bangladesh election results
Dhananjay Munde: 'कामधेनू' देवाभाऊ, धनुभाऊंच्या इच्छा पूर्ण करतील का? मंत्रीमंडळात पुनरागमनाच्या चर्चांना बीडमध्ये उधाण

बांग्लादेशातील आवामी लीगने नेहमी भारत समर्थक भूमिका घेतली होती. मात्र, बीएनपी हा कट्टर भारत विरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बीएनपी सत्तेत आल्याने भारताची डोखेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com