

Mumbai APMC : आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता 'राष्ट्रीय बाजार'चा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. या बाजारपेठेचे नियंत्रण आणि व्यवस्थापन उच्चस्तरीय बोर्डाच्या हाती गेले असून पणनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकताच अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
या बाजार समितीची वार्षिक उलाढाल 10 हजार कोटींच्या घरात आहे. या 'राष्ट्रीय बाजार'च्या उच्चस्तरीय बोर्डात स्थान मिळवण्यासाठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. इच्छुकांची मंत्रालयापासून ते स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. काही इच्छुक स्वत:ला संधी न मिळाल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यांला संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
रावल यांच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतेवेळी आजी-माजी सदस्य पुष्पगुच्छ घेऊन स्वागताला हजर होते. यातून त्यांची नव्या बोर्डावर जाण्यासाठीची धडपड स्पष्टपणे दिसून आली. हे स्वागत सुरु असतानाच, रावल यांनी इच्छुकांना झटका देत मागील संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे स्वागताला गेलेल्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
असे असेल संभाव्य नवे 'राष्ट्रीय बाजार बोर्ड' (संभाव्य सदस्य संख्या- १४ ते १६ ) :
नव्या प्रशासकीय रचनेनुसार बोर्डाचे स्वरूप अधिक व्यावसायिक आणि शेतकरी धोरणांना पूरक बनवण्यासाठी याची संभाव्य रचना पुढीलप्रमाणे असेल:
१) अध्यक्ष व उपाध्यक्ष: दोन मंत्री स्तरावरील उच्चपदस्थ पदाधिकारी.
२) प्रशासकीय अधिकारी: ३ वरिष्ठ आयएएस (IAS) दर्जाचे अधिकारी.
३) शेतकरी प्रतिनिधी: शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे ४ ते ६ सदस्य.
४) व्यापारी प्रतिनिधी: बाजारातील व्यापाराचे प्रतिनिधित्व करणारे ३ सदस्य.
५) तज्ज्ञ सदस्य: कृषी विपणन क्षेत्रातील १ तज्ज्ञ व्यक्ती.
६) सचिव: संयुक्त निबंधक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी.
७) विशेष निमंत्रित सदस्य: अपेडा, वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.