BMC Election : लाडक्या बहिणी होणार लखपती; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले मोठे आश्वासन, सांगितला 5 लाखांचा प्लॅन...

Devendra Fadnavis announcement : मुंबईकरांनी मागील २५ वर्षांची निष्क्रीयता पाहिली आहे. पाच वर्षे महापालिका सक्रीयपणे जेव्हा काम करते तेव्हा काय परिवर्तन करू शकते, हे पाहावे, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.
Devendra Fadnavis announcement
Devendra Fadnavis announcement Sarkarnama
Published on
Updated on

Women empowerment scheme : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली जात आहे. राज्यात सर्वांचेच लक्ष लागलेल्या मुंबईतही आश्वासनांचा पाऊस पडत आहे. ठाकरे बंधूंनी आपला वचननामा प्रसिध्द केल्यानंतर आज युतीनेही अनेक मोठी आश्वासने मुंबईकरांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप-शिवसेना युतीचा मुंबईसाठीचा वचननामा प्रसिध्द केला. विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पडसाद याही निवडणुकीत उमटत असून त्याच अनुषंगाने युतीने मुंबईतील लाडक्या बहिणींनी मोठे आश्वासन देत आपली ‘व्होट बँक’ अधिक पक्की करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मागील काळात मुंबै बँकेच्या माध्यमातून मुंबईतील लाडक्या बहिणींना एक लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यातील काही महिलांनी चांगले उद्योग सुरू आहेत. आता महापालिकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल. त्यातून त्यांना आपला रोजगार उभा करता येईल. स्वयंरोजगारातून समृध्दीकडे आणि लाकड्या बहिणींकडून लखपती दीदीकडे असा त्यांचा प्रवास आपण करणार आहोत.

Devendra Fadnavis announcement
BMC Election 2026 : 'फडणवीस हे नाव मुंबईला माहिती नव्हतं तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडची तयारी सुरु केलेय, भाजपने सुरू केलाय तो विकास नव्हे विनाश...'

मुंबईकरांनी मागील २५ वर्षांची निष्क्रीयता पाहिली आहे. पाच वर्षे महापालिका सक्रीयपणे जेव्हा काम करते तेव्हा काय परिवर्तन करू शकते, हे पाहावे, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले. वचननाम्यामध्ये इतरही अनेक आश्वासने देण्यात आली आहे. त्यामध्ये महिलांना बेस्टमध्ये ५० टक्के सवलतीत प्रवास, कचरामुक्त आणि प्रदुषणमुक्त मुंबई, रोहिंग्या, बांग्लादेशी मुक्त मुंबईचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मराठी माणसाला परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठीच्या योजनेचे आश्वासनही देण्यात आले आहे.

Devendra Fadnavis announcement
Prakash Ambedkar : गिरीश महाजनांनी उत्पन्न लपवले, डॉ. प्रकाश आंबेडकरांचा आरोप ; बेनामी संपत्तीची आकडेवारीच मांडली..

ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठाकरे बंधूवर निशाणा साधला. त्यांच्या वचननाम्यात मराठी, हिंदुत्वाचा उल्लेख नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीचाही उल्लेख नाही. त्याचा त्यांना विसर पडला आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललो आहे. त्यांचा वचननामा हा टोमणेनामा, घोटाळेनामा आहे. आम्ही लोकांना दिलेला शब्द पाळणार आहोत. त्यांचे पुतणा मावशीचे प्रेम आहे, असे शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com