MNS Shivsena Alliance : मोठी बातमी! शिवडी, दादरचा तिढा सुटला; भांडुप, विक्रोळीवर चर्चा; उद्या होणार युतीची घोषणा

Thackeray brothers alliance News : शिवडीनंतर महत्त्वाच्या असलेल्या दादरचाही तिढा सुटला आहे. तर आता भांडुप, विक्रोळीवर चर्चा सुरु असून उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.
MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance
MNS Uddhav Thackeray Shiv Sena allianceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा चंग सर्वच पक्षांनी बांधला आहे. त्यासाठी भाजपने महायुतीमध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती आहे. शिवडीनंतर महत्त्वाच्या असलेल्या दादरचाही तिढा सुटला आहे. तर आता भांडुप, विक्रोळीवर चर्चा सुरु असून उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. शिवडीनंतर आता दादरचाही तिढा सुटला आहे. दादरमधील ज्या दोन वॉर्डवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यावर आता एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादरमधील प्रभाग क्रमांक 192 ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर प्रभाग क्रमांक 194 मनसेकडे जाणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे.

MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance
BJP dominance : नगरपालिका निवडणूक भाजपच्या आमदार-खासदारांची जहागिरी : राष्ट्रवादी, शिवसेनेतही नात्यागोत्याचे वर्चस्व

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू युती करणार हे निश्चित झाले असून येत्या एक-दोन दिवसात त्याची घोषणा केली जाणार आहे. युतीमध्ये काही जागांवरुन जो पेच सुरू आहे तो आजच सोडवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे. दादरमधील प्रभाग क्रमांक 192 आणि 194 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. त्यानंतर यामधील एका प्रभागात ठाकरेंची शिवसेना (Shivsena) उमेदवार देणार तर दुसऱ्या प्रभागात मनसेकडून उमेदवार दिला जाणार आहे. शिवसेना 192 मध्ये तर 194 मध्ये मनसे लढणार असल्याची माहिती आहे.

MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance
Shivsena Politics : गळती थांबेनाच! ठाकरेंचे पहिल्या फळीतले सर्वच नेते गेले शिंदे सेनेत; आता 'हा' नेता करणार भाजपत प्रवेश

सोमवारी सकाळी शिवडीमधील 3 प्रभागांवरून अडलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या सेनेला, तर एक जागा मनसेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर भांडूपच्या वॅार्ड क्रमांक 114 वरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जागा हव्या आहे तिथे रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून जिथे पेच निर्माण झाला आहे तो पेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सोडवला जात आहे.

MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance
Pune MNS: पुण्यात मनसेचा 2012चा फॉर्मुला; ठाकरे सेनेसोबत युती झाल्यास माजी नगरसेवकांना संधी

जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करणार आहेत. दादर विभागातील काही जागांची मागणी मनसेनं केली होती. तर ठाकरेंची शिवसेनाही या जागांसाठी आग्रही आहे. त्याचसोबत शिवडी, माहीम, भांडुप, विक्रोळी या मतदारसंघातील जागांचाही तिढा होता. मराठीबहुल भागातील वॉर्डसाठी दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं आहेत, मात्र त्यावर अधिक ताणू नका अशा सूचना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

MNS Uddhav Thackeray Shiv Sena alliance
Congress News : सोलापूरमध्ये काँग्रेसची धुळधाण : 12 नगरपालिकांमध्ये 'पंजावर' फक्त 2 नगरसेवक विजयी; प्रणिती शिंदे आहेत कुठे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com