Kishori Pednekar : उद्धव ठाकरेंची रणरागिणीकडे मोठी जबाबदारी; मुंबई महापालिकेत बलाढ्य भाजप अन् शिंदेंच्या शिवसेनेला भिडणार!

Mumbai Municipal Corporation News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सभागृह नेतेपदी अमेय घोले यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सभागृहातच 50 खोकेच्या घोषणा देण्यात आल्या.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेत बलाढ्य भाजपला नाकीनऊ आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी महापौर आणि विद्यमान गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी (16 फेब्रुवारी) सभागृहात करण्यात आली. अनुभवी, आक्रमक, मुलूख मैदानी तोफ अशी पेडणेकर यांची ओळख आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर महापालिकेच्या महापौरपदी 25 वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपच्या रितू तावडे या महापौर झाल्या आहेत तर उपमहापौरपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. त्यानंतर सोमवारी स्थायी समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यासाठी महापालिकेची सभा पार पडली.

Uddhav Thackeray
Pune BJP Congress Rada: काँग्रेस भवन दगडफेक: भाजपचे घाटे, काँग्रेसचे शिंदे यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

यावेळी महापौर रितू तावडे यांना सभागृहात येण्यास उशीर लागल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यातच सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या रणरागिणी किशोरी पेडणेकर यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Uddhav Thackeray
Shivsen Vs MNS : सेटलमेंट कोण कोणाशी करतंय, हे जनतेला माहिती आहे; सुनील प्रभूंचा राज ठाकरेंवर निशाणा

त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) सभागृह नेतेपदी अमेय घोले यांची निवड करण्यात आली. ही घोषणा होताच ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातच ५० खोकेच्या घोषणा दिल्या. किशोरी पेडणेकर गेल्या टर्ममध्ये मुंबई महापालिकेच्या महापौर होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी सभागृहात करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com