BMC Election : मुंबई महापालिकेत भाजपचा 'पॉवर गेम'! स्वीकृत सदस्यपदाची जबाबदारी 'या' चार निष्ठावंत नेत्यांवर सोपविणार

nominated members BMC News : मुंबई महापालिकेत यावेळेस पासून पाचऐवजी आता दहा स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. बुधवारी होणाऱ्या महासभेत दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा होणार आहे.
Devendra fadnavis, Ritu tawde
Devendra fadnavis, Ritu tawde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले आहे. महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्यानंतर आता महापालिकेतील इतर पदाधिकारी निवडी करण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेत यावेळेस पासून पाचऐवजी आता दहा स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. बुधवारी होणाऱ्या महासभेत दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वांचे या निवडीकडे लक्ष लागले आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला येत असलेल्या स्वीकृत सदस्यपदाची जबाबदारी चार निष्ठावंत नेत्यावर सोपवली जाणार असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ पाहता भाजपचे चार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तीन तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन तर काँग्रेसचा एक स्वीकृत नगरसेवक होणार आहेत. हे पक्षनिहाय संख्याबळ पाहता आता सर्वच पक्षाने नगरसेवकांची नावे फायनल केली आहेत. बुधवारी होणाऱ्या महासभेत दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.

Devendra fadnavis, Ritu tawde
BJP political News : 50 खोके एकदम ओके? मुख्यमंत्री भेटलेल्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश अन् व्हिडीओ व्हायरल...

भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी 'या' चार निष्ठावंत नेत्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपकडून या पदासाठी प्रतीक कर्पे, कमलाकर दळवी, नितेश सिंह, प्रवीण छेडा यांची नावे फायनल केली असल्याचे समजते. मुंबईतील मराठी, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांचे संतुलन राखण्यासाठी या नावांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून निष्ठावंतांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ज्या नेत्यांनी निवडणुकीत पक्षासाठी पडद्यामागून काम केले, त्यांना महापालिकेत प्रतिनिधित्व देण्याची रणनीती यामागे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Devendra fadnavis, Ritu tawde
NCP leader rape case : अभिषेक कळमकर याचा काळा कारनामा; मोठ्या ताईंची शांतता की समर्थन? चित्रा वाघांचा सडेतोड हल्ला

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांना मिळून दोन स्वीकृत नगरसेवक पाठवता येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे असणार आहेत. या पदासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे, निष्ठावंत शिवसैनिक यांचे नाव जवळपास फायनल असल्याचे समजते.

Devendra fadnavis, Ritu tawde
Shivsena VS BJP : शिवसेना नेत्याचा भाजपवर मोठा आरोप; 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येत असलेल्या तीन स्वीकृत नगरसेवक पदापैकी एक पद मनसेला देण्यात यावे अशी मागणी केली जात होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या कोट्यातील तीनही स्वीकृत नगरसेवक आपल्या पक्षातूनच देण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांची नावे फायनल करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मनसेला स्वीकृत नगरसेवक पदाऐवजी आता प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे समजते.

Devendra fadnavis, Ritu tawde
Congress MLAs Tour : नेतृत्व बदलाच्या वादळात २१ आमदार थेट परदेश दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com