Mumabi News : मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. महापौर-उपमहापौर यांची निवड होताच आता पदाधिकारी निवडीला वेग आला आहे. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवड 28 फेब्रुवारीला निवड केली जाणार आहे. या पदावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तिघांची वर्णी लागणार आहे. त्यासाठी या तीन जणांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक पद येत आहेत. त्यापैकी एक नगरसेवकपद उद्धव ठाकरे यांनी मनसेला द्यावे, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्यांच्या पक्षातील तीन जणांच्या नावावर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी यादी होती. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक ही तीन नावे फायनल करण्यात आली आहेत. 28 फेब्रुवारी रोजी या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा होणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) तीन स्वीकृत नगरसेवक पद मिळणार असल्याने एक पद मनसेला सोडावे, अशी मागणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील तीन जणांना या पदावर संधी दिली आहे. त्यामुळे आता मनसेच्या अपेक्षांवर पाणी सोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
दरम्यान, बुधवारी मुंबई स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या प्रभाकर शिंदे यांची तर शिक्षण समितीचीच्या सभापती सभापतीपदी भाजपच्या राजश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड झाली तर त्यासोबतच बेस्ट समितीच्या सभापतीपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची तर सुधार समितीच्या सभापतीपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोषी यांची वर्णी लागली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.