Mumbai Contractor Death : आझाद मैदानात आंदोलन सुरू असतानाच कंत्राटदाराने आयुष्य संपवलं; वर्षभरापूर्वीच पत्रातून मांडली होती व्यथा

Contractor Pending Bills Crisis : कंत्राटदारांसाठी काम पूर्ण केल्यानंतर वेळेत बिलाची रक्कम मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, बिले रखडल्याने कामासाठी घेतलेले कर्ज, मजूर आणि साहित्याचे पैसे, तसेच इतर खर्च भागवताना त्यांच्यावर आर्थिक ताण निर्माण होतो.
Mumbai Contractor Gajanan Devkate
Mumbai Contractor Gajanan DevkateSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Contractor Death : मुंबईत थकीत बिलांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे सरकारी कामे करणाऱ्या कंत्राटदारांसमोर असलेल्या आर्थिक अडचणींचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गजानन देवकाते यांनी सुमारे वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून आपल्या अडचणी मांडल्या होत्या. अनेक कामे पूर्ण करूनही त्यांची बिले मिळत नसल्याची तक्रार त्यांनी या पत्रातून केली होती. बिले मिळवण्यासाठी कार्यालयाच्या दहा-दहा वेळा चकरा माराव्या लागतात, तरीही पैसे मिळत नसल्याचे त्यांनी पत्रात लिहिलं होतं.

कंत्राटदारांसाठी काम पूर्ण केल्यानंतर वेळेत बिलाची रक्कम मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, बिले रखडल्याने कामासाठी घेतलेले कर्ज, मजूर आणि साहित्याचे पैसे, तसेच इतर खर्च भागवताना त्यांच्यावर आर्थिक ताण निर्माण होतो आणि याच तणावामुळे देवकाते यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे मुंबईतील आझाद मैदानावर कंत्राटदारांनी थकीत बिलांच्या मुद्द्यावर आंदोलन पुकारले आहे. कंत्राटदारांची तब्बल 86 हजार कोटी रुपयांची बिले थकीत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. अडकलेली बिले तातडीने मिळावीत, यासाठी कंत्राटदार आक्रमक झाले आहेत.

Mumbai Contractor Gajanan Devkate
Nagpur Firing : काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार, मध्यरात्री मोठा आवाज आला अन्..., धक्कादायक व्हिडिओ आला समोर

तर दुसरीकडे गजानन देवकाते यांच्या आत्महत्येची घटना घडल्याने कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. देवकाते कोणत्या विभागासाठी काम करत होते, त्यांनी कोणती कामे केली होती आणि त्यांची सरकारकडे नेमकी किती रक्कम थकीत होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागासह शासनाच्या विविध विभागांसाठी छोटी-मोठी कामे करणाऱ्या कंत्राटदारांना वेळेवर बिले न मिळाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवस्थेवर होतो. त्यामुळे देवकाते यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर केवळ एका कंत्राटदाराचा प्रश्न म्हणून न पाहता, सरकारी कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाचा प्रश्न सरकार किती गांभीर्याने सोडवते, याकडे आता कंत्राटदारांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com