Nagpur Firing : काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार, मध्यरात्री मोठा आवाज आला अन्..., धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Congress Corporator Attacked : काँग्रेस नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे यांच्या घरावर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून जात असतानाच हल्लेखोराने मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळी झाडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Nagpur Firing | Congress Corporator Attacked
Nagpur Firing | Congress Corporator AttackedSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Congress Corporator Attacked : नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शहरातील प्रभाग क्रमांक २६ चे काँग्रेस नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. वाठोडा परिसरातील श्रावणनगर येथील स्वामीनारायण मंदिराच्या मागे असलेल्या त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला.

या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळी लागल्याने घराची काच फुटली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून मोटघरे यांच्या घराजवळ आल्या. त्यापैकी एका व्यक्तीने चेहरा कपड्याने झाकलेला होता. दुचाकीवरून जात असतानाच त्याने मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

गोळीबाराच्या आवाजाने मोटघरे यांना जाग आली. घराची काच फुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घराबाहेरील CCTV फुटेज तपासले. त्यामध्ये दोन जण दुचाकीवरून येताना आणि त्यापैकी एकाने घराच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहे. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.

Nagpur Firing | Congress Corporator Attacked
Pune ZP : बारामती, दौंड, शिरूरमधील ZP शाळांवर अचानक धाडी; प्रशासनाची धाकधूक वाढली! मुंढेंचे अधिकारी मैदानात

माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनीही मध्यरात्री मोटघरे यांच्या घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, राजकीय कारण किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आला, याचा पोलीस तपास करत आहेत.

Nagpur Firing | Congress Corporator Attacked
Tribal Students Protest : काँग्रेसने अचूक टायमिंग साधलं; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे फडणवीस सरकारची कोंडी

हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचा माग काढण्यासाठी तपास पथके कामाला लागली आहेत. दरम्यान, भरवस्तीत एका लोकप्रतिनिधीच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोर कोण आणि गोळीबारामागील नेमके कारण काय, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com