सोमय्या अडचणीत! खोटे आरोप न करण्याची न्यायालयानंच दिली तंबी

भाजप नेते किरीट सोमय्या यांना खोटे आरोप न करण्याची तंबी न्यायालयाने दिली आहे.
Kirit somaiya News
Kirit somaiya NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोविड सेंटरमध्ये डॉक्टर पुरवण्याचे कंत्राट मिळवल्याचा आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. या प्रकरणी सोमय्या हे अडचणीत आले आहेत. मुंबईतील दिवाणी न्यायालयानं सोमय्यांना तंबी देत खोटे आरोप न करण्याची ताकीद दिली आहे.

मुंबईतील शहर दिवाणी न्यायालयाने सोमय्या यांच्या संदर्भात दाखल खटल्याच्या आदेशात म्हटले आहे की, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि त्याच्या भागीदारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचे विधान करण्यापूर्वी एक जबाबदार व्यक्ती असल्याने किरीट सोमय्या यांनी वस्तुस्थितीची पडताळणी करायला हवी होती. किरीट सोमय्या यांनी केवळ त्यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आधारे बदनामीचे आरोप केले आहेत. या पुढे आरोप करताना संबधित कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारावर माध्यमांशी बोलावे. विनाकारण खोटे आरोप यापुढे करू नयेत.

Kirit somaiya News
सीसीटीव्हीत पाहिलंय ते शिवसेनेचेच होते! प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

याप्रकरणी पाटकर यांनी सोमय्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. सोमय्यांनी राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 100 कोटीं रुपयांच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला होती. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडे चौकशीची मागणीही सोमय्यांनी केली होती. पाटकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हे कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाने भागीदारी फर्म स्थापन केल्याचा आरोप सोमय्यांनी राऊतांवर केला होता. सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोविड सेंटरमध्ये डॉक्टर पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोविड सेंटरवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर पुरवले जायचे. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सोमय्यांनी म्हटले होते.

Kirit somaiya News
हम किसी को छेडेंगे नही, पर किसीने छेडा तो छोडेंगे नही! भातखळकरांचा शिवसेनेला इशारा

सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे वाईन व्यवसायातील भागीदार असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. संजय राऊत यांच्या मुली पूर्वशी आणि विधिता संचालक असलेल्या कंपनीत सुजीत पाटकर भागीदार असल्याची माहितीही सोमय्यांनी समोर आणली होती. आधीही सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन कंपनीत भागीदारी केल्याचा आरोप केला होता. राऊत यांची उद्योगपती अशोक गर्ग यांच्या वाईन कंपनीत भागीदारी असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com