

Imran Khan: अभिनेता इम्रान खान यानं मुंबईत झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात हजेरी लावली होती. त्यावरुन भारत सोडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती, त्यानंतर हे प्रकरणं हायकोर्टात पोहोचलं. याप्रकरणात आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं अभिनेत्याला माफी मागण्यास भाग पाडलं. त्यानंतर त्याच्याविरोधातील नोटिशीला तात्पुरती स्थगितीही दिली.
सुपरस्टार आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान हा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया (OCI) कार्डधारक आहे. म्हणजेच त्यानं आपलं भारतीय नागरिकत्व सोडलं असून त्याच्याकडं सध्या अमेरिकेचं नागरिकत्व आहे. यापार्श्वभूमीवर हायकोर्टानं इम्रान खानला सुनावलं की, "तो OCI कार्डधारक असल्यानं त्याला देशावर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यामुळं त्यानं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर कर बिनशर्त माफी मागावी अन्यथा आपल्या कृतीवर दिलगिरी व्यक्त करावी. त्याचबरोबर भविष्यात SIR विरोध होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी होणार नाही, अशी गॅरंटीही द्वावी. कोर्टाच्या या आदेशानंतर इम्रान खाननं कोर्टाची माफी मागितली आणि प्रतिज्ञापत्रही सादर केलं. यात त्यानं म्हटलं की, आपण पुन्हा देशात सुरु असलेल्या सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी होणार नाही," त्यानंतर कोर्टानं त्याच्याविरोधात जारी करण्यात आलेली भारत सोडण्याच्या नोटिशीला ७ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली.
खरंतर FRRO देश सोडण्याच्या दिलेल्या नोटिशीला इम्रान खाननं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. नोटिशीत त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आलं होतं. आधी कोर्टानं या नोटिशीवर २ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली होती, पण आता या स्थगितीची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोर्टानं सुनावणीदरम्यान FRROला देखील खडसावलं होतं. कोर्टानं तोंडी स्वरुपात म्हटलं की, "इम्रान खान गेल्या ४० वर्षांपासून भारतात राहतो, तसंच त्याचं कुठलंही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यामुळं त्याला भारत सोडण्याची नोटीस पाठवण्यापूर्वी कमीत कमी त्याला स्वतःची बाजू मांडण्याची एक संधी दिली जायला हवी होती"
१० ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात इम्रान खान देखील हजेरी लावली होती. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. इम्रान खानला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली की, अभिनेता इम्रान खान यानं OCIच्या नियमांचं आणि व्हिजाचं उल्लंघन केलं आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी इम्रान खानविरोधातील FIR FRROला पाठवली होती. याआधारे FRROनं १४ ऑक्टोबर २०२६ रोजी इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस पाठवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.