Mumbai High Court : मोठी बातमी! राहुल गांधी, ठाकरे, राऊतांच्या अडचणी वाढणार; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

Mahavikas Aaghadi Political News : काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , खासदार संजय राऊत, युट्यूबर ध्रुव राठी आणि इतरांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
uddhav thackeray rahul gandhi sanjay raut
uddhav thackeray rahul gandhi sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : लोकसभा निवडणूक मोदी सरकारसाठी प्रतिष्ठेची तर विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या अस्तित्वाची होती. या निवडणुकीत आरोप- प्रत्यारोपांनी राजकारण चांगलंच तापलं होतं.

अखेर या देशात भाजपप्रणित एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले. आणि इंडिया आघाडी सव्वा दोनशेच्या पार गेली. विरोधकांचा संसदेत आवाज वाढला.पण या सगळ्या घडामोडीनंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, फायरब्रँड नेते व खासदार संजय राऊत आणि यूट्युबर ध्रुव राठी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत, युट्यूबर ध्रुव राठी आणि इतरांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर ईव्हीएमबाबत खोट्या,एकतर्फी आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या सर्व मंडळींनी मीडियात ईव्हीएम मशिन्सविषयी अनाठायी प्रतिक्रिया दिल्याचा याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.गांधी,ठाकरे, राऊत,राठी यांची एसआयटीमार्फत चौकशीची करण्यात यावी अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. भांडुपमधील इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनच्यानं ही याचिका दाखल मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

uddhav thackeray rahul gandhi sanjay raut
Zhadani Land Purchase case : तब्बल 620 एकर जमीन विकत घेणारे चंद्रकांत वळवी म्हणतात, सर्वसामान्य माणसाला त्रास तोच मलाही..

मुंबई हायकोर्टात इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी (ता.11) सुनावणी पार पडली. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्देश देते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, आगामी काळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होत असल्यामुळे पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक लढती चुरशीच्या झाल्या.त्यात मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची लढतीतही काँटे की टक्कर पाहायला मिळाली.या लढतीत अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव केला होता.या विजयानंतर शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज आहे, असा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

uddhav thackeray rahul gandhi sanjay raut
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 'सभापति'पदासाठी महायुतीमधील 'या' इच्छुकांत रस्सीखेच

हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे. मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी होती. त्यानंतर केंद्रावर रवींद्र वायकर यांच्या गटाकडून मोबाईल वापरला, असा आरोप या दोन्ही उमेदवारांनी केला आहे.

याचिकेत काय म्हटलंय..?

ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकत नाही असा निर्णय निवडणूक आयोग तसेच मुंबई पोलिसांनी दिला आहे.तरीही याचिकेतील प्रतिवाद्यांनी खोट्या, एकतर्फी, आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या, असा आरोप करत इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनने केला आहे.हे एक षडयंत्र असल्याचा आरोप करत चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आरोपींविरुद्ध दंडात्मक कारवाई करत या याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी याचिकेत केली आहे.

uddhav thackeray rahul gandhi sanjay raut
Pooja Khedkar and Center Committee : पूजा खेडेकर यांच्यावरील आरोपांचा तपास करण्यासाठी केंद्राकडून विशेष समितीची स्थापना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com