Crime News : महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर परप्रांतीयांचा हल्ला! चार मुलींना बेदम मारहाण, मनसेचा पोलिसांना थेट इशारा

Four girls and their father were allegedly assaulted in Kalyan East. MNS demands strict police action after a woman police constable's family reports the incident : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात मुलीला अश्लील मेसेज पाठवल्याचा जाब विचारल्याने वाद; महिला पोलिस कर्मचाऱ्याचा पती आणि चार मुलींना मारहाण केल्याचा आरोप, मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Police News : मुंबईच्या कल्याण पूर्व भागात, मराठी माणूस आणि परप्रांतीय वाद उफळला आहे. परप्रांतीय गुन्हेगारांनी थेट महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबांवर हल्ला चढवलाय. यात महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पती आणि चार मुलींना बेदम मारहाण केली. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांकडे तक्रार नोंदवून देखील कारवाई होत नसल्याने, पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने कारवाईला गती आली.

मुलीला अश्लील मेसेज पाठवण्याचा जाब विचारण्यावरून वादाला सुरूवात झाली. महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीला आणि चौघा मुलींना या परप्रांतीय गुंडांना बेदम मारहाण (Crime) केली. या गुंडांनी मारहाणीत मुलींच्या अंगावरील कपडे फाडले. या प्रकारातून परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. सुजीत जैस्वाल, नीरज जैस्वाल, शुभम जैस्वाल आणि प्रदीप वर्मा या चौघांनी ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

पीडित महिला पोलिस कर्मचारी मुंबई पोलिस (Mumbai Police) दलाच्या वाहतूक विभागात कार्यरत आहे. या मारहाणीनंतर पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार नोंदवली. पण पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पीडित कुटुंबांने धाव घेतली.

Kalyan Crime News
Aaditya Thackeray Phone Tapping : राहुल गांधींच्या फोन टॅपिंगवर आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट! भाजपच्या मंत्र्यांवरही पाळत; म्हणाले, 'पक्षातच गुप्तचर यंत्रणा'

मनसे कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष निर्मल निगडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच मुंबईत काही भागात छठ पूजेचे कार्यक्रम सुरू आहेत. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मनसे सूचकपणे म्हटले आहे.

Kalyan Crime News
Ajit Pawar NCP MLAs : शरद पवारांच्या संपर्कात अजितदादांचे 22 ते 26 आमदार? फडणवीस अलर्ट; महायुतीत मोठी खळबळ!

या परप्रांतीय गुंडांनी, महिला आणि मुलींना बेदम मारहाण केली आहे. मुलींचे कपडे फाडले आहेत. यात विनयभंगासारखा प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंबातील महिला मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरी मुंबई पोलिस कारवाईसाठी कुणाच्या आदेशाची वाट पाहात आहे, असा खडा सवाल मनसेने केला आहे. मुजोर परप्रांतीयांवर कारवाई होत नसले, तर मनसे आपल्यापद्धतीने दणका देण्याची तयारीत आहे, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.