Mumbai Municipal Result : केंद्रातील सत्ता, राज्यातील सत्ता, CM फडणवीसांची तगडी यंत्रणा : त्यानंतरही मुंबईत भाजपच्या फक्त 7 जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंची जोरदार फाईट

BJP Winning Strategy : मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. भाजपने येथे विजय मिळवत सर्वांना चकीत केले. तर, ठाकरे बंधूंन 71 जागा मिळाल्या.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झाला आहे. मात्र, ज्या प्रकारे ही निवडणूक लढली जात होती त्यातून भाजप भव्य यश मिळवेल असे चित्र होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी जोरदार फाईट दिली. त्यामुळेच 2017 मध्ये 82 जागांवर असलेली भाजप केवळ सात जागा अधिक मिळवू शकली. भाजपला 89 तर शिंदेंना 29 जागांवर विजय मिळाला आहे.

केंद्रातील सत्ता, राज्यातील सत्ता, CM फडणवीसांची तगडी यंत्रणा असताना भाजपला स्वबळावर 100 पार करता आली नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, मनसेला सहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एक जागा मिळाली आहे.

मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. लोकसभेनंतर भाजपने विधानसभेमध्ये एकहाती सत्ता मिळवली. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत देखील भाजपचे 120 नगराध्यक्ष निवडणूक आले होते. त्यामुळे मुंबईत भाजप स्वबळावर लढत विजय मिळवणार अशा चर्चा होत्या. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेत त्यांना 90 जागा दिल्या.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Mumbai Municipal Election Results : हार-जीतचा थरार शिगेला! मुंबईत माजी महापौर–उपमहापौरांचा गुलाल, राजकीय शक्तिप्रदर्शन

मराठी मतांमध्ये फूट?

मुंबईच्या मुख्य शहरातमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगला प्रतिसदा मिळाला. मात्र, उपनगरामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप मोठा विजय मिळवला. त्यातच मनसेला दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. मराठी मतांमध्ये पडलेल्या फुटीमुळे आणि इतर भाषिक मराठी मतदारांच्या विरोधात एकवटल्यामुळे भाजपचा विजय झाल्याची चर्चा आहे.

पक्षीय बलाबल

भाजप - 89

शिवसेना (शिंदे) - 29

राष्ट्रवादी (अजित पवार) - 3

शिवसेना (ठाकरे) -65

मनसे -6

राष्ट्रवादी (शरद पवार) - 1

एमआयएम -८

काँग्रेस - 24

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Pune Winner Candidate List: पुणेकरांनो, तुमचा नगरसेवक कोण? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com