Mumbai municipal elections : मुंबईत मतदानापूर्वीच महायुतीला मोठा धक्का; 4 प्रभाग हातातून गेले, भाजप-एकनाथ शिंदेंचा प्लॅन फसला!

Political News : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून भाजपकडून प्लॅनींग केले जात आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीसाठी महायुती व ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये जोरदार रस्सीखेच होत आहे. त्यातच मुंबईत मतदानापूर्वीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. एकमेकाला टफ लढत देण्याच्या उद्देशाने महायुतीने काही उमेदवाराची घोषणा करणे शेवटच्या क्षणापर्यंत टाळले होते. काही ठिकाणी बंडखोरांना रोखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्याचा भाजप-एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्लॅन फसला असून चार प्रभागात महायुतीचे उमेदवार नसल्याने हे प्रभाग हातातून गेले आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून भाजपकडून प्लॅनींग केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता मिळवण्याचे प्लॅनींग केले जात असतानाच महायुतीला मोठा तांत्रिक आणि राजकीय फटका बसला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी पाळलेली कमालीची गुप्तता भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या अंगाशी आली आहे. मुंबईतील 4 महत्त्वाच्या प्रभागांमध्ये महायुतीचा एकही अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मतदानापूर्वीच महायुतीने या 4 जागा गमावल्याचे मानले जात आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
AIMIM BJP alliance : 'AIMIM'नं बिनशर्त पाठिंबा काढून घेतला; भाजपच्या अकोट मंचासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही धाडलं पत्र!

मुंबईत महायुती 227 जागांपैकी महायुती केवळ 223 जागांवर निवडणूक लढवणार आहे. बंडखोरांना रोखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रकार अंगाशी आला आहे. या नादात महायुतीचे 4 प्रभागांत उमेदवारच उभे राहू शकले नाहीत. त्यामुळे महायुती समोरील अडचणी वाढल्या आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Shivsena Politics : नगरपालिकेच्या प्रचारात शिंदेंचा सामंतांना फोन, तर महापालिकेसाठी नेमकं उलटं..., 'ती' घोषणा हवेत असतानाच दिलं आणखी एक मोठं आश्वासन

मुंबईतील चार प्रभागात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार नाहीत. दक्षिण मुंबईतील प्रभाग 211, दक्षिण मुंबईतील प्रभाग 212, ट्रॉम्बे-चिता कॅम्प प्रभाग 145, कुर्ला पश्चिम प्रभाग 167 या चार वार्डात महायुतीचा उमेदवार नाही. याठिकाणी भाजप व षीने यांच्या शिवसेनेने डमी उमेदवार न दिल्याने फटका बसला आहे. निवडणुकीत मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून 'डमी' उमेदवार दिला जातो. मात्र, यावेळी जागावाटपाचा पेच आणि नावांची गुप्तता पाळण्यासाठी उमेदवारांना रात्री उशीरा पक्ष कार्यालयात बोलावून एबी फॉर्म देण्यात आले. या घाईघाईत आणि गोपनीयतेत डमी अर्ज भरले गेले नाहीत, परिणामी तांत्रिक कारणांमुळे किंवा वेळेअभावी या 4 प्रभागांत महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणाबाहेर गेले आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Congress crisis : काँग्रेसने कष्टाने निवडून आणलेले 6 नगरसेवक फुटले : भाजपच्या निकटवर्तीय नेत्याला उपनगराध्यक्ष करण्यावरून पक्षात भूकंप

प्रभाग 145 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विरुद्ध काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी लढत होत आहे. तर प्रभाग 167 मध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि समाजवादी पक्ष यांच्यात लढत होत आहे. तर प्रभाग क्रमांक 211 मध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष अशी लढत होता आहे. तर प्रभाग क्रमांक 212 मध्ये काँग्रेस, मनसे आणि अखिल भारतीय सेना यांच्यात चुरस दिसत आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
पुण्यात अपघात, ताफा थांबवून Ajit Pawar धावले जखमींच्या मदतीला धावले, NCP, Pune Election 2026

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. मुंबईत मात्र 4 जागांवर उमेदवार नसणे ही त्यांच्यावर नामुष्की असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे महापालिकेच्या मॅजिक फिगरपर्यंत 114 पोहोचण्यासाठी महायुतीला आता उर्वरित 223 जागांवर अधिक जोर लावावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
BJP News: भाजप आमदाराचा 'उद्योग'; बावनकुळेंच्या डोक्याला ताप; दोन सभांमध्ये बंडखोर उमेदवारांचा धुडगूस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com