Mumbai politics : मुंबई महापालिकेच्या चाव्या कोणाकडे? भाजपकडून ही चार नावे चर्चेत; फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष

BMC treasury control News : मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या 25 वर्षानंतर भाजपकडे असणार आहेत. हे जवळपास निश्चित झाले असून त्यामध्ये ही चार नावे चर्चेत आहेत. त्यामुळे त्यापैकी एकाची वर्णी लागणार आहे.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची तर उपमहापौरपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी विराजमान झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आगामी काळात होत असलेल्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीकडे लागले आहे. त्यानंतर या सदस्यातूनच स्थायी समितीच्या अध्यक्षांची नाव केली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या 25 वर्षानंतर भाजपकडे असणार आहेत. हे जवळपास निश्चित झाले असून त्यामध्ये ही चार नावे चर्चेत आहेत. त्यामुळे त्यापैकी एकाची वर्णी लागणार आहे.

मुंबई महापालिकेत स्थायी समितीमध्ये एकूण 27 सदस्य असतात. यामध्ये 26 सदस्य हे निवडून आलेल्या 227 नगरसेवकांमधून प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारावर नियुक्त केले जातात. तर 1 पदसिद्ध सदस्य असतो शिक्षण समितीचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. जानेवारी 2026 च्या निवडणुकीत मिळालेल्या जागांनुसार भाजपला 10, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेला 4, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 7, काँग्रेसला 3 इतर मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमला प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 सदस्य असलेल्या महायुतीचा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.

Mumbai Municipal Corporation
BJP Politics: लहान पद, मोठी मागणी! नगरसेविकेने मंत्र्यांनाही लाजवत कोट्यवधींचा बॉम्ब टाकला! चक्क ३०० कोटींची डिमांड!

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजप-एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची बहुमतात असल्याने स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचाच (BJP) नेता बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या या पदासाठी भाजपमधील या चार नेत्यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा आहे.

Mumbai Municipal Corporation
Shivsena-BSP Alliance : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, अमरावतीच्या राजकारणात ट्विस्ट, शिवसेनेची-बहुजन समाज पक्षासोबत युती!

स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका राजश्री शिरवडकर (Rajshree Shirvadkar) यांचे नाव आघाडीवर आहे. प्रभाग क्रमांक 172 मधून पुन्हा निवडून आलेल्या राजश्री शिरवडकर त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. महिला प्रतिनिधी म्हणूनही त्यांना संधी दिली जाऊ शकते.

Mumbai Municipal Corporation
NCP Leadership : ‘विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजितदादांकडे देण्याचा निर्णय पवारांसह सर्व नेत्यांनी घेतला होता’

भाजपचे तरुण आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे प्रभाग क्रमांक 68 चे नगरसेवक रोहन राठोड यांचे नावही चर्चेत आहे. ते मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षातील तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या धोरणानुसार त्यांचे नाव पुढे येऊ शकते.

Mumbai Municipal Corporation
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

त्याशिवाय माजी स्थायी समिती सदस्य आणि ज्येष्ठ नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांचे नाव अनुभवाच्या जोरावर चर्चेत आहे. तसेच, आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांचे नावही शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता चर्चेत असलेल्या चौघा जणांपैकी कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Mumbai Municipal Corporation
BJP Vs Shivsena UBT : हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा मुस्लिम महापौर; भाजपने दाखवला आरसा; ही तर 'जनाब सेना' म्हणत डिवचले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com