Nana Patekar : "एक महिला आपलं घरदार"; हुंड्याच्या वक्तव्यावर करुणा शर्मांची नाना पाटेकरांवर टीका

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांना त्यांच्या एका पोस्टवरून करुणा शर्मा यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.
Nana Patekar - Karuna Sharma
Nana Patekar - Karuna SharmaSarkarnama
Published on
Updated on

Nana Patekar News : अभिनेते नाना पाटेकर यांना त्यांच्या एका पोस्टवरून करुणा शर्मा यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. "जशी पोटगी कायदेशीर आहे त्याचप्रमाणे हुंडा देखील कायदेशीर व्हायला पाहिजे". अशी पोस्ट नाना पाटेकर यांनी केली ती आपण बघितल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या. याच पोस्टवरुन करुणा मुंडे यांनी नाना पाटेकर यांचा समाचार घेतला. माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या आव्हान याचिकेवरही माहिती दिली.

करुणा शर्मा म्हणाल्या, नाना पाटेकर साहेबांची एक पोस्ट मी बघितली. ज्यात त्यांनी म्हंटलं की, जशी पोटगी कायदेशीर आहे त्याप्रमाणे हुंडाही कायदेशीर व्हायला पाहिजे. त्यावर त्यांना मी एकच सांगते की, नाना भाऊ महिलांची एक व्यथा असते. एक महिला आपलं पूर्ण घर कुटुंब सोडून आपलं अस्तित्व विसरून एका पुरुषाचं अस्तित्व निर्माण करते.

Nana Patekar - Karuna Sharma
Rohini Khadse : 'माझ्या वडिलांना काय विचारता? तुमच्या वरिष्ठांना..., तुम्ही चार पक्ष..', रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना करारा जवाब

त्यानंतर तो पुरुष तिला रोडवर सोडतो, ते ही दोन मुल बाळ झालेले असताना. मग सांगा ती महिला कुठे जाणार, पोटगी नाही मागणार? खर्च नाही मागणार तर काय करणार? त्याच्यावर तुम्ही भाष्य करत आहात. हुंडा कायदेशीर का व्हायला पाहिजे? एक स्त्री नसती तर पुरुषाची निर्मिती झाली नसती असेही मत त्यांनी व्यक्त केले.

धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या पोटगी प्रकरणाच्या आव्हान याचिकेवरील माहिती देताना शर्मा म्हणाल्या, 29 तारखेला अंतिम सुनावणी होणार आहे. आम्ही 29 तारखेला न्यायालयात युक्तिवाद करणार आहोत. हा मॅटर अर्जंट असल्यामुळे ही सुनावणी 29 तारखेला ठेवली आहे. कोर्टाने मला दोन लाख रुपये मेंटनन्स दिला आहे. मात्र, तेवढ्यावर मी समाधानी नाही.

Nana Patekar - Karuna Sharma
West Bengal BJP MP : आरडाओरडा केल्यास गळा दाबेल, भाजप नेत्याची महिलांना धमकी; नेमकं काय आहे प्रकरण...

आम्हाला कमीत कमी 15 लाख रुपये मिळावेत अशी मागणी आम्ही न्यायालयात केली होती. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा याचिका दाखल करणार आहोत. आता कमीत कमी वाढवून 9 लाख रुपये देण्यात यावेत. तसेच आमचा कोर्टाचा खर्च 25 लाख रुपये झालेला आहे. ते देखील आम्हाला द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com