Political Crime News : मोठी बातमी ! शिंदे गटाचा आमदार गोत्यात? ननावरे दाम्पत्य मृत्यूप्रकरणी आमदाराच्या 'पीए'सह चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

Dhananjay Nanaware Cut Finger : धनंजय ननावरेंनी बोट तोडल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी
Ujjwala Nanaware, Nandkumar Nanaware, Dhananjay Nanaware
Ujjwala Nanaware, Nandkumar Nanaware, Dhananjay NanawareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी आमदार पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरेंनी पत्नीसह आत्महत्या प्रकरणात ठाणे पोलीस 'अॅक्शनमोड'वर आले आहेत. या प्रकरणाचा छडा लावून, पोलिसांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) एका आमदाराच्या 'पीए'सह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराच्या निकटवर्तीयाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या या कारवाईने ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येमागे राजकीय 'कनेक्शन' असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात तीन-चार जाणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी या घटनेत शिंदे गटातील कोण आमदार याची चर्चाही आता होऊ लागली आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या आमदाराचे नाव उघड होऊ शकते. (Latest Political News)

नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने वीस दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील घराच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक 'व्हिडिओ रेकॉर्ड' करून ठेवला होता. त्यात त्यांनी आपला मानसिक छळ करणाऱ्यांची नावे सांगितली होती. मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणावरही कारवाई केलेली नव्हती. याकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नंदकुमार यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आपल्या शरीराचा एक भाग दर आठवड्याला तोडून देणार असल्याचा 'व्हिडिओ' शुक्रवारी व्हायरल केला.

धनंजय यांनी 'ऑन कॅमेरा' आपल्या डाव्या हाताचे एक बोट तोडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून पाठवणार असल्याचे सांगितले. तसेच जोपर्यंत ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत दर आठवड्याला आपल्या शरीराचा एक भाग तोडून पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या 'व्हिडिओ'नंतर पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करून शिंदे गटातील एका आमदाराच्या 'पीए'सह तीन-चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघेजण राजकीय वर्तुळातील वावरत असल्याने ननावरेंच्या आत्महत्येमागे नेमको कोणाचा हात आहे? यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मात्र धनंजय यांच्या पवित्र्यावर पोलीस यंत्रणेचे डोळ उघडले असून तपासाला वेग दिला आहे.

दरम्यान, नंदकुमार ननावरे यांनी पत्नी उज्वला यांच्यासह मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक 'व्हिडीओ रेकॉर्ड' केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी हा 'व्हिडीओ' पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व त्यांच्या निवडक सहकाऱ्यांना पाठवला होता. तसेच आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या खिशात एक चिट्ठीही मिळाली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com