
Narendra Jadhav Interview : महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सुत्र लागू करताना इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात डॉ. रघुनाथ माशेलकर समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीनं दिलेला अहवाल मला शंभर टक्के अमान्य आहे, अशी भूमिका डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडली आहे. नरेंद्र जाधव हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्रिभाषा सुत्राची अंमलबजावणी करण्यासाठी तयार केलेल्या नव्या समितीचे अध्यक्ष आहेत. जाधव यांनी माशेलकर समितीचा अहवाल नाकारण्याबरोबरच आपली समिती का महत्वाची आहे? हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांच्या पॉडकास्टवर मुलाखत देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, "माशेलकरांच्या अहवालाची जी भूमिका आहे ती मला शंभर टक्के अमान्य आहे. ती प्रत्येक मराठी माणसाला संपूर्णपणे अमान्य असली पाहिजे, सध्या जे उर बडवेपणा करत आहेत त्यांनाही ही भूमिका मान्य असलीच पाहिजे किंबहुना हे अमान्य करावचं लागले. पण मग अमान्य करायचं असेल तर त्याचा पुनर्विचार करावा लागेल, तो पुनर्विचार करण्यासाठीच माझ्या अध्यक्षतेखालील समितीचा जन्म झालेला आहे. पण तरीही आम्ही या समितीला सहकार्य करणार नाही, आम्ही या समितीचा निर्णय स्विकारणार नाही, असं म्हटलं जात आहे. पण चुकीच्या समितीचा निर्णय तुम्ही स्विकारलात आणि त्याचा पुनर्विचार करणारी जी समिती आहे, ती तुम्ही नाकारत आहात"
माशेलकर समितीचा अहवाल हा हिंदीची सक्ती करण्यासंबंधीचा आहे आणि तो मागील सरकारनं स्विकारलेला होता. त्यानंतर नवीन समिती जो अहवाल करणार आहे, त्याचा निर्णय काय होईल? त्याच्या शिफारशी काय असतील? हे खुद्द त्या समितीच्या अध्यक्षांनाही माहिती नाही. अजून समिती तयार झालेली नाही तरी सुद्धा या समितीचा अहवाल काय असेल? हे गृहित धरुन आंदोलन करायचं, याला काही अर्थ नाही. ते ही निवडणूक जवळ आलेली असताना करायचं याला काही अर्थ नाही, त्यामुळं याला वेगळाच वास येतो आहे.
पण हिंदी भाषेला विरोध करताना लहान मुलांवर भाषेचा अतिरेक नको हा मुख्य आक्षेप घेण्यात आला होता. पण त्यासाठी हिंदी सक्तीच का करता आहात? हे देखील आक्षेप घेण्यात आला. यावर बोलताना नरेंद्र जाधव म्हणाले, "मला हे आरोप मान्य आहेत. पण हे आक्षेप माशेलकर समितीचा अहवाल आला तेव्हा का बरं घेतले गेले नाहीत. त्यावेळी महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन व्हायला पाहिजे होती, तेव्हा कोण हा मायचा लाल आहे? ते बोलले होते का? पण त्यावर आत्ताच का बोलता आहात? याच्या मागचं कारण उघडपणे राजकारण हेच आहे. म्हणूनच मराठीचा मुद्दा तापवण्यात येतो आहे, याची मला भीती आहे.
माझ्या पन्नास वर्षांच्या करियरमध्ये मी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत ३५ वर्षे काम केलं आहे. ते जेव्हा राजकारणाच्या आजुबाला पण नव्हते केवळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांच्याबरोबर मी काम केलं आहे. ते जाहीरपणे असंही बोलले होते की सर्व वंचित समाजातल्या युवा-युवतींसाठी आदर्श कोण असेल? रोल मॉडेल कोण असेल? तर ते नरेंद्र जाधव आहेत. मग असा माणूस संघाचा माणूस असू शकतो का? त्यानंतर सोनिया गांधींनी मला पाच वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. त्यांनी मला राष्ट्रीय सल्लागार परिषदेवर नियुक्त केलं होतं. कुठल्याही नेत्याला किंवा तथाकथित विचारवंताला केलं नाही, त्याचं काय कारण होतं? मी संघाचा आहे म्हणूनच का? असा सवालही नरेंद्र जाधव यांनी उपस्थित केला.
तर, नरेंद्र मोदींसोबत मी राज्यसभेवर असताना पाच वर्षे काम केलेलं आहे. पण डॉ. मोहन भागवत यांनी माझ्या काही पुस्तकांचं प्रकाशन केलं पण त्यामुळं महाराष्ट्रात गदारोळ झाला. पण माझ्या सर्व पुस्तकांची प्रकाशनं ही कोणी केलीत ते पाहा. स्वतः मनमोहन सिंग, याधीचे दोन उपराष्ट्रपती, प्रणव मुखर्जी, आत्ताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि नंतर मोहन भागवत या सर्वांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे तर, मग मी फक्त संघाचाच कसा ठरतो? त्यातही मी काँग्रेसच्या विचारधारेपासून दूर गेलो असं लोकांना वाटतं. पण त्यांनी असा विचार करायला पाहिजे की नरेंद्र जाधव या माणसामध्ये असं काय आहे की, इतक्या विविध विचारसरणीच्या लोकांनाही तो आपल्या कामासाठी हवाहवासा वाटतो. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये काहीतरी असेल ना? ते काय असेल तर 'योग्यता'. याचा अर्थ मी कुठलाही झेंडा खांद्यावर घेऊन पुढे जातो आहे असा होत नाही, अशा सडोतोड शब्दांत नरेंद्र जाधव यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.