Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरे गटाचं ठरलं! ओवळा माजिवाडात मणेरा हेच उद्याचे 'नरेश'

Naresh Manera : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात
Uddhav Thackeray, Naresh Manera, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Naresh Manera, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ठाकरे गटातून इनकमिंग सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्याला लक्ष्य केले. ठाकरे गटाने थेट ओवळा माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला आहे. या मतदारसंघाचा नरेश मणेरा हेच उद्याचे 'नरेश' असतील, असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. मणेरा हे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. आता ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या करिश्म्याला ते कसे छेद देतात, आणि ठाकरेंनी दिलेल्या संधीचे कसे सोने करतात, हेच पाहावे लागणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख व वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत बोलत होते. दरम्यान, खासदार संजय राऊतांनंतर चोवीस तासांतच विनायक राऊतांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक रुची विनायक राऊत, युवासेना महाराष्ट्र सहसचिव धनश्री राजन विचारे, संगमेश्वर सभापती दिलीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Uddhav Thackeray, Naresh Manera, Eknath Shinde
Mahesh Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या शिलेदाराने महाविकास आघाडीची कुंडलीच काढली; काय आहे मुद्दा ?

राऊत म्हणाले, मणेरा (Naresh Manera) हे आपल्या उपमहापौर कालावधीपासून ते आजपर्यंत सतत कार्यरत राहिले आहेत. त्यांनी घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन येथील मतदार त्यांना निश्चित आमदार करतील, त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. आपल्या कामाचे येथील मतदार योग्य ते मूल्यमापन करुन तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत विजयाच्या मानाचे पान प्राप्त करुन देतील, असा विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊत म्हणाले, अधिकारवाणीने सांगतो, नरेश मणेरा, या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे उद्याचे आमदार आहेत, अशी खात्री आहे. तत्पूर्वी खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मणेरा यांना विधानसभेवर पाठविण्याची जबाबदारी खासदार राजन विचारेंची असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खासदार विनायक राऊतांनी उद्याचे आमदार आहेत असे म्हटले आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने आता या मतदारसंघाची लढत शिंदे विरुद्ध ठाकरे अशी होणार हे निश्चित झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Naresh Manera, Eknath Shinde
Vidhan Sabha Election : राजुरा मतदारसंघासाठी भाजपच्या दोन नेत्यांची धावाधाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com