Nashik Loksaha : मुख्यमंत्री शिंदे, हेमंत गोडसेंचा एकाच कारने प्रवास; नाशिकचा तिढा सुटला?

Hemant Godse : हेमंत गोडसे यांनी ठाण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते दादर असा एकाच गाडीतून प्रवास केला.
Eknath Shinde, Hemant Godse
Eknath Shinde, Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : महायुतीमधील नाशिकची जागा शिवसेनेची आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला (अजित पवार गट) सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमधून छगन भुजबळ हे उमेदवार असावेत म्हणून दिल्लीतून सुचना करण्यात आल्या. मात्र, शिवसेना Shivsena (शिंदे गट) नाशिकवरील आपला दावा सोडण्यास तयार नाही. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट पु्न्हा तिकीट देण्यास भाजपचा विरोध आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा अजुनही सुटलेला नाही. आज (रविवारी) हेमंत गोडसे यांनी ठाण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते दादर असा एकाच गाडीतून प्रवास केला.

Eknath Shinde, Hemant Godse
Hemant Godse News : हेमंत गोडसेंचा पत्ता का कट झाला, ठाकरे गटाच्या बडगुजरांनी सगळंच सांगितलं

नाशिकच्या जागेविषयी मुख्यमंत्री शिंदे (Eknath shinde )आणि हेमंत गोडसे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजले नसले तरी. ही चर्चा सकारात्मक झाली असून नाशिक शिवसेनेकडेच राहणार असल्याची सांगण्यात येत आहे. हेमंत गोडसे (Hemant godse) हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपचा त्यांना होणार विरोध पाहता दुसऱ्या नावाची देखील चाचपणी एकनाथ शिंदेंकडून करण्यात येत आहे.

नाशिकची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार गट) त्या बदल्यात त्यांची सातरची जागा भाजपला अशी चर्चा होती. मात्र, शिंदे गट नाशिकवरील आपला दावा सोडण्यास तयार नसल्याने सातरमधील जागेवर देखील तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, नाशिकची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास हेमंत गोडसे व्यक्त करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध आहे तर छगन भुजबळ यांचा प्रचार गोडसे करणार नसल्याने त्यांच्या तिढा आहे. त्यामुळे शिंदे गटाला तिसरा उमेदवार शोधावा लागत असल्याची टीका केली.

Eknath Shinde, Hemant Godse
Jayant Patil News : '400 पारच्या गप्पा मारणाऱ्यांनी 200 पार करुन दाखवावं'; आमदार पाटलांनी ललकारलं!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com