

New Mumbai News: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिजिटल सुरक्षेलाच सायबर हॅकर्सनी थेट आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील SBI च्या ग्लोबल IT सेंटरमध्ये हॅकर्सनी 15 ते 21 ऑक्टोबर असा तब्बल सहा दिवस अनधिकृत प्रवेश करत तब्बल 3 लाख 75 हजार रेकॉर्ड्स चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सीबीडी बेलापूरच्या ग्लोबल आयटी सेंटरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत YONO 2.0 आणि RAAS ॲप्लिकेशन्समधील 3.75 लाख रेकॉर्ड्स,32 CSV फाइल्स आणि 2721 PDF फाइल्स चोरीला गेल्याची पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरीचा डेटा डार्क वेबवर टाकल्याचाही दावा करण्यात येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीबीडी बेलापूर शाखेतील झालेल्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यात बँकेतील ग्राहकांचे खाते क्रमांक,पासवर्ड किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चोरीला गेले नसल्याचं सध्यातरी सांगितलं जात आहे. या धक्कादायक घटनेची तक्रार दिल्यानंत पोलिसांनी अज्ञात हॅकर्सचा शोध सुरू केला आहे.
सरकारी राष्ट्रीयकृत बँकेच्या आयटी यंत्रणेत झालेल्या या कथित सायबर हल्ल्यामुळे ग्राहकांची बँकेतील डिजिटल माहिती सुरक्षित आहे का अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. चोरी झालेल्या रेकॉर्ड्समध्ये नेमकी काय माहिती आहे, तिचा खरंच गैरवापर करण्यात आला आहे का, याबाबत अद्यापतरी काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एसबीआयच्या अधिकाऱ्यानं याप्रकरणी बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, अज्ञात हॅकर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्यातरी या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे,त्याचं नेटवर्क कुठुन सुरू आहे, डेटाचा वापरला कुठे करण्यात आला या व अशा अनेक पद्धतीनं बेलापूर सीबीडी पोलिस तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.