Ganesh Naik vs Eknath Shinde
Ganesh Naik vs Eknath Shinde Sarkarnama

Navi Mumbai Politics : एकनाथ शिंदेंचे दोन 'विजय' लढाईपूर्वीच मैदानातून गायब : गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला एकट्या शिलेदाराच्या टकरा

Ganesh Naik vs Eknath Shinde : नवी मुंबईतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सर्व अलबेल नसल्याचे चित्र आहे. पक्षातील महत्वाचे नेते सक्रीय नसल्याचा फटका पालिका निवडणूक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on

Navi Mumbai Shivsena News : राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा अजित पवार गट असे महायुतीचे सरकार आल्यानंतर नवी मुंबई शहरात राजकीय गटांची ताकद वाढली आहे. एकेकाळी विरोधी पक्षात असणाऱ्या शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतरही एकनाथ शिंदेंनी ताकद वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून १८ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेतील माजी नगरसेवकांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. या नगरसेवकांना उमेदवारीत सामावून घेण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांचा खटाटोप सुरू आहे.

एका बाजूला नवी मुंबईच्या राजकारणात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला असला, तरी पदाधिकार्‍यांमध्ये काहीच आलबेल नाही. ऐरोली विधानसभा निवडणुकीत बंडखोरीनंतर माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे सध्या पक्षात सक्रिय दिसत नाहीत. बेलापूरमध्ये निवडणूक लढवणारे उपनेते विजय नाहटा काही दिवसांपासून स्थानिक राजकारणात दिसत नाहीत. अंतर्गत हेवेदावेमुळे प्रवेश केलेल्यांनी परतीचा मार्ग गाठला आहे.

दोन विजय सक्रीय नसताना बेलापूर मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर हेच पक्षाचा गाडा हाकताना दिसत आहेत. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde
Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कमी होईनात, अंजली दिघोळे यांची उच्च न्यायालयात धाव...

२०१५ नंतर चित्र बदलले

२०१५ नंतर २०२० मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते, मात्र कोरोनामुळे लांबणीवर पडली. या दरम्यान राज्यात राजकीय उलथापालत होऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले, या पक्षांतराचे पडसाद स्थानिक स्तरावर उमटले. सत्ता येताच एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यामुळे नवी मुंबईतही शिवसेनेची ताकद वाढली आहे. काँग्रेसकडे आता नगरसेवक उरलेले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादीकडे दो आकडीही नगरसेवक राहिलेले नाहीत. बहुतांश नगरसेवकांचा कल शिवसेना आणि भाजपकडे आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde
Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचा फोन बंद; कोणत्याही क्षणी अटक? मंत्रिपदासोबत आमदारकीही जाणार, दमानियांच्या दाव्याने खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com