नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Nawab Malik news |Supreme Court| ED| इडीने २३ फेब्रुवारी नवाब मलिक यांना रोजी ईडीने (ED) अटक केली होती.
Nawab Malik
Nawab Malik
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मलिक यांनी त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने मलिक यांना दणका देत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता नबाव मलिक यांनी थेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) कथित संबंध आणि मनी लॉंण्ड्रिंग प्रकरणात इडीने २३ फेब्रुवारी नवाब मलिक यांना रोजी ईडीने (ED) अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १३ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. त्याचवेळी नवाब मलिक यांना तुरुंगात बेड आणि अंथरुणासोबत एक खुर्चीही देण्यास मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

Nawab Malik
हा नंबर पाठ करून ठेवा 112... पोलिसांसाठी कोठूनही डायल करा...

दरम्यान, तुरुंगात असताना नवाब मलिक यांची काही दिवसांतच प्रकृतीच्या समस्या जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाठदुखी व इतर व्याधींचा त्रास होत असल्याचे सांगत मलिक यांनी न्यायालयात बेड, खुर्चीची मागणी केली होती. कोठडी संपत आल्याने त्यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, नवाब मलिकांच्या वकिलांनीच त्यांच्या अटक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या न्यायालयीन कोठडीला विरोध केला आहे. मलिक यांच्या वकीलांनी ईडीची कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाईला आव्हान दिले. मात्र, न्यायालयाने त्यांच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. त्यानंतर आता नबाव मलिक यांनी ईडीच्या (ED) कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयच काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com