वानखेडेंचा 'निकाहनामा' आला समोर! मलिकांनी दिला आणखी एक पुरावा

मलिकांकडून आरोपांची मालिका सुरूच.
Sameer Wankhede Marriage Certificate
Sameer Wankhede Marriage Certificate
Published on
Updated on

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोटे जातप्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्यासाठी त्यांच्याकडून मागील काही दिवसांपासून वानखेडे यांच्यासंदर्भातील काही कागदपत्रे पुढे आणली जात आहेत. सुरूवातीला त्यांनी वानखेडे यांचा मुंबई महापालिकेत नोंद असलेला जन्मदाखला जारी केला. तर बुधवारी त्यांनी थेट वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे कथित प्रमाणपत्र (निकाहनामा) (Marriage Certificate) जारी करत वानखेडेंच्या अडचणी वाढवल्या आहेत.

मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्यावर सतत आरोप केले जात आहेत. प्रामुख्याने वानखेडे यांनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याच्या आरोपावर ते ठाम आहेत. त्यांच्या या आरोपांवर वानखेडे यांच्याकडून त्यांच्या वडिलांची जातप्रमाणपत्र, शाळेचा दाखला आदी कागदपत्रे प्रसिध्द करण्यात आली आहेत. आपण कोणतीही फसवणूक केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Sameer Wankhede Marriage Certificate
वानखेडे आल्यापासून एनसीबीतील चार अधिकारी निलंबित!

पण मलिकांच्या म्हणण्यानुसार, वानखेडे यांच्या वडिलांनी धर्मांतर केले होते. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. पण वानखेडे यांनी त्याआधीची कागदपत्रे सादर करून नोकरीसाठी फसवणूक केल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. त्यासाठी सुरूवातीला त्यांनी वानखेडे यांचा जन्मदाखला सादर केला. त्यावर त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असेच होते. तर बुधवारी त्यांनी वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र सादर केले. त्यावरही समीर दाऊद वानखेडे असेच नाव आहे. त्यांचा विवाह 7 डिसेंबर 2006 रोजी शबाना कुरेशी यांच्याशी झाल्याचे प्रमाणपत्रवर दिसते.

मलिकांच्या या आरोपांना वानखेडे आता काय उत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, जर मी खोटे प्रमाणपत्र दिले असेल तर त्यांनी स्वत:हून आपले जात प्रमाणपत्र दाखवावे, असे आवाहन मलिकांनी (Nawab Malik) वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिले आहे. याबाबत बोलताना त्यांनी वानखेडेंचा जन्मदाखल्याचा संदर्भ दिला आहे.

सोबतच आता लवकरच वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रावर काही लोक तक्रार करणार आहेत, जातवैधता समितीपुढे वानखेडेंचा दाखला पाठवला जाणार आहे. असाही इशारा मलिक यांनी दिला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आता वानखेडेंच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र याबाबत नियम आणि न्यायालय काय सांगते हे बघणे महत्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com