एनसीबीने आर्यनविरोधात प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राचाच घेतला आधार

जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Aryan Khan
Aryan Khan

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी होणार आहे. आर्यनच्या जामिनाला एनसीबीने (NCB) विरोध केला असून या टप्प्यावर जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल, असं प्रतिज्ञापत्र एनसीबीनं न्यायालयात सादर केलं आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) प्रतिज्ञापत्राचाही आधार एनसीबीनं घेतला आहे.

एनसीबीने न्यायालयात मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये एनसीबीने प्रभाकरच्या प्रतिज्ञापत्राचाही आधार घेतला आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांनुसार साक्षीदारांवर दबाव आणण्याचे स्पष्ट झाल्याचे एनसीबीनं म्हटलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र कोणत्याही न्यायालयात सादर कऱण्यात आलेलं नाही. पण हेतुपूर्वक ते माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Aryan Khan
वानखेडे आल्यापासून एनसीबीतील चार अधिकारी निलंबित!

या टप्प्यावर आर्यनला जामीन दिल्यास त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध समोर आले आहेत. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कमधील लोकांच्या तो संपर्कात होता. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये, असं एनसीबीनं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. प्रभाकर याने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

दरम्यान, जामीनासाठी आर्यनकडूनही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. यामध्ये त्याने साक्षीदार प्रभाकर साईलशी तसेच त्याने केलेल्या आरोपांशी कोणताही संबंध नसल्याचे आर्यनने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज 20 ऑक्टोबरला फेटाळला होता. या प्रकरणी आर्यन याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) हे बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Aryan Khan
एनसीबी अधिकाऱ्याचं पत्र उघड; शहांना सांगून राकेश अस्थानांनी वानखेडेंना एनसीबीत आणलं!

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 2 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. आर्यनच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे बाजू मांडणार आहेत. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आर्यन खानला आज उच्च न्यायालयाकडून जामीन मिळणार की नाही उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com