NCP Crisis Update : दादा की साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणाचं पारडं जड ? लवकरच 'फैसला' !

Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवार यांच्या समर्थक आमदारांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

NCP Crisis And Monsoon Session : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचा दावा केला. तर शरद पवार गटाकडे १९ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याची अधिकृतपणे यादी अद्याप जाहीर केलेली नाही. दरम्यान, पावसाळी अधिवेशन आज सोमवार (ता. १७)पासून सुरू होत आहे.

या अधिवेशनापूर्वी अजित पवार यांनी समर्थक आमदारांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला किती व कोण-कोण आमदार उपस्थित राहणार याकडे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतरच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्हीगटांची ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंना मोठा धक्का; बीडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; कार्यकर्त्यांचा BRS मध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षातील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना तर काही आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला. पक्षाच्या काही आमदारांनी तळ्यात मळ्यात भूमिका घेतली. तर काही असेही आमदार आहेत की ज्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. अशा स्थितीत आज होणाऱ्या उपमुख्यमंत्री पवार यांनी समर्थक आमदारांची बैठक 'ए ५' बंगल्यावर सकाळी नऊ वाजता होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहणार नाही त्या आमदारांना अजित पवार गटाचा 'व्हिप' बजावून कारवाई करण्यात येणार आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Neelam Gorhe News : शिंदे गटात प्रवेश केलेल्या नीलम गोऱ्हेंचं टेन्शन वाढणार ? ठाकरे गट घेणार 'हा' महत्वाचा निर्णय

अजित पवार गटाकडून प्रतोद म्हणून विधानसभेच्या आमदारांना अनिल पाटील तर विधानपरिषदेच्या आमदारांना अमोल मिटकरी हे 'व्हिप' बजाणार आहेत. तर शरद पवार गटाकडून विधानसभेच्या आमदारांना जितेंद्र आव्हाड तर विधानपरिषदेच्या आमदारांना शशिकांत शिंदे 'व्हिप' बजावणार आहेत. त्यामुळे आजच दोन्ही गटाचे संख्याबळ स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज विधानसभेचे अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. तर विधानपरिषदेचे कामकाज दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com