मलिकांचा आवाज कोणी दाबू शकत नाही : क्लाईड क्रास्टो

आज ईडी (ED) अधिकाऱ्यांनी नवाब मलिकांच्या (Nawab Malik) घरावर छापा टाकला असून त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
Clyde Crasto
Clyde Crastosarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केंद्रातील (Central Government) भाजप (BJP) सरकारविरोधात ठाम भूमिका आणि अनेक कारनामे उघड करणारे राष्ट्रवादीचे (NCP) मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, सत्याचा आवाज कोण दाबू शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Cristo) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांच्या घरावर आज (ता. 23 फेब्रुवारी) ईडी (ED) अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे.

Clyde Crasto
नवाब मलिक आज गौप्यस्फोट करणार होते, म्हणून भाजपने ईडीला समोर केले...

क्रास्टो म्हणाले की, केंद्रातील भाजपसरकार महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांच्याविरोधात नवाब मलिक यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून जोरदार आवाज उठवला आहे. त्याचाच भाग म्हणून मलिक यांच्याविरोधात अशाप्रकारची कारवाई केली जात आहे. मात्र, सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. मलिक यांचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही, अश्या शब्दात क्रास्टो यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Clyde Crasto
मलिकांचे कारस्थान बाहेर येतयं ; 'त्या' १९ बंगल्यांची माहिती राज्यपालांना दिली..

दरम्यान, आज मलिकांच्या घरावर ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, मलिक स्वतःच ईडीच्या कार्यालयात हजर झाले असल्याचीही माहिती आहे. सध्या ईडीच्या कार्यालयात त्यांची त्यांची चौकशी सुरु आहे. दाऊद इब्राहिम मनिलाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असल्याचे समजते आहे. मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय मलिकांवर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com