NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. अजित पवारांसह एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षावरही अजित पवारांनी दावा केल्यामुळे राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत.
यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. "एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचं 24 तासांत पत्र तयार होतं. पण शरद पवार यांना एकटं कसं सोडायचं? त्यामुळे जयंत पाटील यांनी ते पत्र दिलं नाही", असा मोठा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना केला.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
"एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर 24 चोवीस तासांत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा द्यावा, अशा प्रस्तावाचं पत्र तयार होतं. त्यावर अजित पवारांसह अनेक आमदारांनी सह्याही केल्या होत्या. अजित पवारांनी सांगितलं म्हणून आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. त्यामध्ये मी देखील सही केली होती. पण ते पत्र जयंत पाटलांनी शरद पवारांना दिलंच नाही. शरद पवार यांना एकटं कसं सोडायचं त्यामुळे जयंत पाटील यांनी ते पत्र दिलं नाही", असा मोठा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान, त्यावेळी या सर्वाला विरोध करणारे पहिले आमदार प्राजक्त तनपुरे होते. हे योग्य नाही, असंही ते म्हणाले होते, असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी आज केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या खुलाशामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.