Chhagan Bhujbal : मोठी बातमी! बारामतीत टीका केल्यानंतर भुजबळ आज 'सिल्व्हर ओक'वर; अर्ध्यातासापासून 'वेटिंग'वर

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीचं कारण अद्याप समजलं नाही.
chhagan bhujbal sharad pawar (1).jpg
chhagan bhujbal sharad pawar (1).jpgsarkarnama
Published on: 
Updated on: 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. रविवारीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.

त्यानंतर सोमवारी भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यातच भुजबळ आणि शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या भेटीचं कारण अद्याप समजलं नाही.

भुजबळ रविवारी काय म्हणाले होते?

"आरक्षणाबाबत सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते. मात्र आयत्या वेळी बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला," असं म्हणत भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) बारामतीतील 'जनसुराज्य रॅली'तून शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं.

chhagan bhujbal sharad pawar (1).jpg
Video Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांचा मोठा आरोप, 'बारामतीमधून फोन गेला आणि...'

छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. यातच भुजबळ आज सोमवारी शरद पवार यांच्यासाठी भेटीसाठी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी पोहचले आहेत.

chhagan bhujbal sharad pawar (1).jpg
Supriya Sule Vs Chhagan Bhujbal : बारामतीतून फोन गेला म्हणणार्‍या भुजबळांना सुप्रिया सुळेंचे खुलं चॅलेंज; म्हणाल्या...

पण, छगन भुजबळ वेळ न घेताच शरद पवार 'सिल्व्हर ओक'वर आल्यानं त्यांना 'वेटिंग'वर थांबावे लागले आहे. आज केवळ शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार मिलिंद नार्वेकर यांना वेळ देण्यात आला होता, अशी माहिती 'साम'ला सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.