NCP Politics : राज्यात दोस्ती ठण्यात कुस्ती! डेटा सेंटर अन् वाहतूक कोंडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आंदोलनाची घोषणा

NCP Najib Mulla Announces Protest : शहरातील अनधिकृत जागांवर उभारण्यात आलेल्या आलिशान बंगल्यांच्या प्रकरणाकडेही नजिब मुल्ला यांनी लक्ष वेधले. तसेच नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत, असे सांगितले.
Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

NCP News : महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे. मात्र, स्थानिक राजकारणात एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र अनेक शहरांमध्ये दिसून येते. तसेच चित्र ठाण्यात आहे. त्यातच ठाणे शहरातील बाळकुम येथील प्रस्तावित डेटा सेंटर, घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, नव्या मॉलला मंजुरी आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत शहरातील विविध प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत प्रशासनावर टीकेची झोड उठवली.

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी हा ठाणेकरांसाठी दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला प्रश्न असून, शहराच्या वाहतूक नियोजनातील त्रुटी यासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला.

वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन आणि प्रभावी वाहतूक आराखडा राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याच बरोबर ठाण्यात आधीच अनेक मोठे मॉल अस्तित्वात असताना आणखी एका नव्या फिनिक्स मॉलला मंजुरी देण्यामागील औचित्य काय, असा प्रश्न उपस्थित करत शहराच्या क्षमतेचा आणि नागरिकांच्या हिताचा विचार करूनच अशा प्रकल्पांना परवानगी दिली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील अनधिकृत जागांवर उभारण्यात आलेल्या आलिशान बंगल्यांच्या प्रकरणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. संबंधित प्रकरणांमध्ये ठाणे महापालिकेने कोणताही दुजाभाव न करता निष्पक्ष आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील विकासकामे आणि मोठ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता, योग्य नियोजन आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले.

Thane Municipal Corporation
Hormuz Strait Attack : अमेरिका-इराण संघर्षात पुण्यातील कुटुंब उद्ध्वस्त; जहाजावरील हल्ल्यात मर्चंट नेव्ही अभियंत्याचा मृत्यू

बाळकुम डेटा सेंटरविरोधात रणशिंग

बाळकुम येथे प्रस्तावित डेटा सेंटरच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नजीब मुल्ला यांनी १ ते ३ ऑगस्टदरम्यान नागरिकांसोबत व्यापक आंदोलनाची घोषणा केली आहे. डेटा सेंटरमुळे पर्यावरण, आरोग्य, वाहतूक आणि स्थानिक पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली. या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन, त्या चिंतेला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. तसेच, यापूर्वीही या विषयावर आंदोलन केल्याची आठवण नजीब मुल्ला यांनी करून दिली.

Thane Municipal Corporation
Maharashtra Politics : जयंत पाटील अन् CM फडणवीसांच्या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

PMC
Beed Nagarpalika
Amol Mitkari
 NCP Sharad Pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com