Maharashtra Political Crisis Live:..अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली; शरद पवारांनी रणशिंग फुंकले!

Rashtrawadi Congress Party: "उषःकाल होता होता … काळरात्र झाली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…"
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडली.

या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आरोप-प्रत्यारोप करत जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांसह बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झालेल्यांवर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणाले, "अजित पवार बोलताना म्हणाले की, तुम्ही शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केलं. मग आता आम्ही भाजपबरोबर गेलो तर काय झालं?, पण जे शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व हे सर्व समावेशक आहे. आठरा पगड जातींना बरोबर घेऊन चालणारे हिंदुत्व आहे. मात्र, भाजपचे हिंदुत्व हे विषारी आहे. जाती-जातीत विष कालवण्याच काम भाजप करत आहे", असा गंभीर आरोपही यावेळी शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar
Ambadas Danve On NCP Crisis : राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रत्येकी शंभर कोटी ? विनवणी अन् दमदाट्याही...

"ज्यांनी बंड केलं त्यांच्याबरोबर किती आमदार गेले याच्या खोलात मी गेलो नाही आणि जाणारही नाही. मला आठवतंय 1980 साली आमचे 68 आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षाचा नेता होतो. त्यावेळी मी काही कामासाठी इंग्लंडला 10,12 दिवसांसाठी गेलो होतो. परत आलो तर आमच्या 68 आमदारांपैकी 62 लोकं गेले आणि मी फक्त सहा आमदारांचा नेता राहिलो".

"त्यानंतर चार वर्षात महाराष्ट्रात अनेक दौरे केले. महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांना भेटलो. पण जे 62 आमदार गेले होते, त्यातील चार सोडून बाकीचे सर्व पडले. एकही निवडून आला नाही आणि पुन्हा 68 लोकं नवीन निवडून आले. नवीन चेहरे आले. त्यामुळे कोणी गेलं तर काही चिंता करू नका", असंही पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar
Jayant Patil Vs Ajit Pawar : जयंत पाटलांचा 'प्रदेशाध्यक्ष'पदावरुन अजितदादांवर थेट वार; म्हणाले, '' मला कानात जरी सांगितलं असतं, तरी....''

"राष्ट्रवादीतून जे बंड करून गेले त्यांना जाऊद्या. जे गेले त्यांची चिंता करू नका. त्यांना तेथे सुखाने राहू द्या. आपण एकत्र आहोत आता महाराष्ट्रात नवीन सहकाऱ्यांची पिढी तयार करू", असं म्हणत सुरेश भट यांच्या गझलीच्या दोन ओळी वाचून दाखवल्या. "उषःकाल होता होता … काळरात्र झाली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…", असं पवार म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.