
Neelam Gorhe on Vidhan Bhavn Incident: महाराष्ट्र विधानसभेत गुरुवारी एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली, ज्यामुळं सर्वांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद केवळ शब्दांपुरता न राहता, शिवीगाळ होत थेट हाणामारीपर्यंत गेला. या घटनेवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देत भाजप आमदार गोपीचंद पडळकर सुधारले असल्याचे सांगितले आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नीलम गोर्हे म्हणाल्या, "अधिवेशनादरम्यान, यापूर्वी सभागृहामध्ये वादविवाद झाले मात्र असे वादविवाद हे नेहमीच होतात. परंतु 29 वर्षानंतर पहिल्यांदाच सभागृहाच्या बाहेर मारामारीची घटना घडली आहे. यानंतर अध्यक्ष आणि सभापतींनी या घटनेची गंभीर दखल घेत काही कडक निर्णय घेतले आहेत. या मारहाणीच्या घटनेबाबत आम्ही जी माहिती घेतली त्यानुसार आमदार जितेंद्र आव्हाड हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर दिसले की सातत्याने घोषणाबाजी करायचे, तसेच त्यांच्यावर दोषारोप होईल अशा प्रकारची वक्तव्य करायचे त्यातूनच तो संघर्ष वाढत गेला. विधिमंडळाच्या परिसरामध्ये कोणीही वरच्या आवाजात एकमेकांवरती ओरडू नये अशा सूचना आहेत. असं असताना देखील या सूचनांचे पालन झालं नाही. त्यामुळे पोलिसांना सर्व गोष्टी आपल्या हातात घ्याव्या लागल्या. ही घटना टाळता आली असती तर बरं झालं असतं असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
अधिवेशनादरम्यान ज्यांच्याकडे पास नाहीत अशा व्यक्ती देखील आमदारांसोबत सभागृहाच्या परिसरात येतात. त्याच्यावर देखील बंधन आणण्यात येणार आहेत. प्रत्येक आमदाराला एक गार्ड आणि एक पीए सोबत आणण्याची परवानगी आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अशा घटना टाळण्यासाठी आमदारांनी फक्त सोबत कामाच्या व्यक्तींनाच घेऊन येणे आवश्यक असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. यापूर्वी पडळकर यांनी सभागृहात केलेल्या वर्तनाबद्दल त्यांना मी शिक्षा केली होती. त्यांनी ती शिक्षा मान्य करून एक दिवस सभागृहात ते बोलले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवसानंतर ते परवानगी घेऊन बोलायला लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये आता मला थोडी सुधारणा झालेली दिसत आहे, असंही गोऱ्हे यांनी सांगितलं.
परंतू, या प्रकरणाबाबत उपसभापती म्हणून मला जी अधिकृत माहिती मिळाली त्यानुसार चिथावणी द्यायची आणि त्याच्यावर व्यक्त झाल्यानंतर ओरडत सुटायचं असं हे झालं, अशा शब्दांत मात्र गोऱ्हे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.