Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शासकीय नोकरी देणार; मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

C M Eknath Shinde Big Announcement: सिकंदर शेखला 5 लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.
Maharashtra Kesari
Maharashtra KesariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र केसरी पुरस्कार जिंकलेल्या सिकंदर शेखला येत्या 15 दिवसांत द्वितीय श्रेणीतील शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तसेच 5 लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेळी देण्यात आली.

सिकंदर शेखने यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिकंदर शेखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर रविवारी वर्षा निवासस्थानी सिकंदर शेखने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेखचा मुंबईतील वर्षा निवासस्थानी सत्कार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maharashtra Kesari
Maratha Reservation : द्वेषातून गुन्हे; माजलगावच्या पोलिस निरीक्षकांवर मनमानीचा आरोप, जरांगेंसमोर कैफियत

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही सिकंदर शेखने कुस्तीतील कौशल्याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्याची माहिती राजू खरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिकंदर शेखच्या खेळाचे कौतुक केले. तसेच चांगले खेळत राहा, महाराष्ट्राच्या कुस्तीचा लौकिक वाढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सिकंदर शेखला द्वितीय श्रेणीतील शासकीय नोकरी येत्या 15 दिवसांत मिळेल, असे आश्वासन दिले. या वेळी वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे नेते राजाभाऊ खरे, पैलवान योगेश बोंबाळे यांच्यासह शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, वस्ताद बाळासाहेब चवरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Edited by : Ganesh Thombare

Maharashtra Kesari
Sambhaji Raje : अन् संभाजीराजे एकदम म्हणाले, ''मला मुख्यमंत्री करा, मी...''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com