राणांचा वाढदिवस तुरूंगातच! कार्यकर्त्यांचं अन्नदान तर दांपत्याला हवं घरचं जेवण

राणा दांपत्याच्या अटकेनं राजकीय वातावरण तापलं
Navneet Rana & Ravi Rana
Navneet Rana & Ravi RanaSarkarnama
Published on
Updated on

अमरावती : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या जामिनावर उद्या (ता. 29) सुनावणी होणार आहे. रवी राणांचा आज वाढदिवस असून, त्यांचा मुक्काम तुरूंगात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीतील साई मंदिरात अन्नदान करून हा वाढदिवस साजरा केला. याचवेळी राणा दांपत्याने घरचं जेवण मिळावे, यासाठी आजच न्यायालयात अर्ज केला आहे. (Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi News)

रवी राणांचा आज वाढदिवस आहे. ते तुरुंगात असल्याने कार्यकर्त्यांनीच त्यांचा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी राणांच्या वाढदिवशी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी राणांच्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीतही ही परंपरा कायम ठेवली. कार्यकर्त्यांनी अमरावतीमधील साई मंदिरात अन्नदान केले. विशेष, रवी राणांच्या वाढदिवशीच या दांपत्याने न्यायालयाकडे अर्ज केला आहे. घरचे जेवण मिळावे, यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. यावर उद्या (ता.29) सुनावणी होणार आहे.

Navneet Rana & Ravi Rana
मुख्यमंत्री बदलणार? पायलट यांच्या हाती सूत्रे देण्याच्या हालचाली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दांपत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. पण यादरम्यान शिवसैनिकांच्या राणांच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी 23 एप्रिलला दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांचा मुक्काम सध्या तुरूंगात आहे.

Navneet Rana & Ravi Rana
मायावती बनणार राष्ट्रपती? सतीशचंद्र मिश्रांनी घेतली थेट योगींची भेट

मागास वर्गातील असल्यामुळे तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर लोकसभा सचिवालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला आदेश देऊन 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. लोकसभा सचिवालयानं याबाबत महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. यावर गृहमंत्री दिलीप वळसे यांनी खुलासा करीत राणांचे सगळे आरोप फेटाळून लावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com