तो व्हिडीओ पाहताच अजितदादांनी साधला मिलिंद नार्वेकरांशी संपर्क

तिरुपती देवस्थानच्या चेक पोस्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला होता
Ajit Pawar, Milind Narvekar
Ajit Pawar, Milind Narvekarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आंध्रप्रदेशमधील तिरूपती बालाजी मंदिरात केवळ गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांची मूर्ती असल्याने प्रवेश नाकारला असल्याचा दावा महाराष्ट्रातील एका भाविकाने केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही याकडे लक्ष वेधले.

अजित पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. याबाबत विश्वस्त मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याशी संपर्क साधला होता. जनतेच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करावा. जी चर्चा सुरू आहे त्याला पायबंद घालावा आणि वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

Ajit Pawar, Milind Narvekar
संपर्क प्रमुख कोरगावकरांवर शिवसैनिकांची पुन्हा नाराजी जाहीर : आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार

मिलिंद नार्वेकरही त्या बाबतीत बोलतील. मात्र, काही दिवसापूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे काही काळात ते तिरुपती देवस्थान बाबतची भूमिका मांडतील, असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, ज्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असेल अशा गाड्यांना तिरूमला तिरूपती देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात येत असल्याचा दावा या भाविकाने केला होता. मंदिराच्या चेक पोस्टवर वाहने अडवण्यात येत असून केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती गाडीमध्ये असल्यानेच मला प्रवेश नाकारण्यात आला, असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. पुढे जायचे असल्यास संबंधित मूर्ती काढून टाका अन्यथा पुढे जाऊ दिले जाणार नाही, असे देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचेही या भाविकाने सांगितले होते.

या घटनेसंबंधी देवस्थान प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून गाडीमध्ये मूर्ती, फोटो अथवा इतर कोणतीही राजकीय निशाणी असणाऱ्या वाहनांवर एका दशकापूर्वी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच संबंधित भाविकाला प्रवेश नाकारला असावा. मात्र, अडवलेल्या गाडीतील मूर्ती शिवाजी महाराजांची असल्याचे समजताच त्यांना प्रवेश देण्यात आला. देवतांच्या चित्रांशिवाय कुठलाच फोटो ठेवण्यास मनाई केली आहे, पण सदर भाविकाने केलेले आरोप खोटे असल्याचेही स्पष्टीकरण देवस्थानने दिले आहे.

Ajit Pawar, Milind Narvekar
Rajan Patil audio clip: राजन पाटील फडणविसांना भेटले...पण स्पष्ट काही बोलेनात!

या घटनेनंतर अनेकांकडून मंदिर प्रशानसावर आक्षेप घेतले जात आहे. रोष व्यक्त केला जात आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्त्यांवर बंदी घातली तर आम्ही महाराष्ट्रीतल लोकं तिथे येणार नाहीत, असा इशारा सोशल मीडियावर अनेकांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com